शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महसूलची १७ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:22 IST

दरवर्षी मोठ्या प्रमाणात महसूल वसूली करणाऱ्या महसूल विभागाचा रिक्तपदांचा आलेख कायम

मोखाडा : दरवर्षी मोठ्या प्रमाणात महसूल वसूली करणाऱ्या महसूल विभागाचा रिक्तपदांचा आलेख कायम आहे. तलाठ्यांची पाच कोतवालांची ४ पदे रिक्त आहेत. तालुक्यात २५९ गावपाड्यांचा समावेश असून लोकसंख्या लाखाच्या घरात आहे. गावाचा महसूल प्रमुख म्हणून तलाठी व तलाठ्याला सहकारी म्हणून कोतवाल ही पदे महत्वाची आहेत. गारपीट, अतवृष्टी, सर्व्हे, निवडणूक, शेतसारा, आम आदमी निराधार योजनेचा अहवाल यासह विविध महत्वपूर्ण बाबी तलाठ्याकडे सोपविण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील कामाचा बोजा वाढत आहे. तर दुसरीकडे पदे रिक्त असल्याने त्यांच्याही कामाचा अतिरिक्त भार याच कर्मचाºयांवर टाकण्यात आलाआहे. तालुक्यामध्ये अवघे १ मंडळ अधिकारी ५ तलाठी व ६ कोतवाल कार्यरत आहेत तहसिल कार्यालयातही अनेक पदे रिक्त आहेत. यामध्ये कार्यालयाअंतर्गत नायब तहसीलदार १ अवल कारकून ४ शिपाई १, लिपिक १ पदे रिक्त आहेत, अशी एकूण १७ पदे महसूल विभागात रिक्त आहेत. यामुळे प्रशासकीय कामावर विपरीत परिणाम होत आहे.याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे अपेक्षीत आहे. मोखाडा नायब तहसीलदारांच्या रिक्त पदांमुळे इतर कर्मचाºयांवर कामाचा अतिरिक्त भार पडत असून त्यामुळे कामाची गती काही प्रमाणात कमी होत आहे. याचा फटका जनतेला बसतो आहे. तसेच प्रशासनाची गतीही मंदावते आहे. अशी खंत तहसीलमधल्या कर्मचाºयांनीच लोकमतकडे व्यक्त केली आहे.

टॅग्स :Governmentसरकारjobनोकरी