शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईच्या भीतीने १७ उद्योग बंद?; तारापूरच्या उद्योगांमध्ये घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 00:10 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तपासणी

पंकज राऊतबोईसर : राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानुसार स्थापन केलेल्या कमिटीच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विशेष पथकामार्फत तारापूर येथील उद्योगांची तपासणी (सर्व्हेक्षण ) सुरू करताच कारवाईच्या भीतीने १७ उद्योग बंद ठेवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हे उद्योग निश्चित का बंद केले आहेत, त्याचा पारदर्शकपणे तपास करण्याची मागणी आता होत आहे.

तारापूर येथे सर्व्हेक्षणाला १८ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयातील एकूण १८ अधिकारी यामध्ये सहभागी झाले आहेत, तर एनजीटीच्या समितीच्या आदेशानुसार १५ डिसेंबरपर्यंत सर्व्हे सुरू राहणार असून १२१६ उद्योगांपैकी आतापर्यंत १४८ उद्योगांचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. त्यामध्ये तारापूरमधील १७ उद्योग बंद आढळले आहेत. याचप्रमाणे दर १५ दिवसांनी ही कमिटी कामाचा आढावा घेत असून १७ सप्टेंबरपासून आतापर्यंत पाच बैठका घेण्यात आल्या आहेत.तपासणी पथक येणार म्हणून उद्योजकांचे धाबे दणाणले असून उद्योगांमधील प्रदूषण नियंत्रण व्यवस्था अपेक्षित क्षमतेची नसल्याने या तपासणीला सामोरे जाण्याऐवजी अनेक उद्योगांनी अशा तपासणीच्या काळात उत्पादन मर्यादित ठेवण्याचे व देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली उद्योग बंदच्या पर्यायाबरोबरच प्रदूषण करणारी उत्पादने थांबविल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे परीक्षण करताना नेमके प्रदूषण काय आणि कुठे होत आहे हे तपासणी यंत्रणा कसे शोधणार? असा सवाल केला जात आहे.

राष्ट्रीय हरित लवादाने आदेश दिले म्हणून थातूरमातूर तपास करून काहीही निष्पन्न होणार नसून कारवाईच्या भीतीने जर उद्योग बंद केले गेले असतील, तर एनजीटीसारख्या न्यायव्यवस्थेच्या आदेशाचा अवमान केल्यासारखे होईल म्हणून तपासणी मोहिमेदरम्यान हे उद्योग का बंद केले आहेत, त्यादृष्टीनेही तपास करून अहवाल पाठवणे गरजेचे आहे.

...तर दोषी उद्योगांवर होणार कारवाईउद्योगांमधील रासायनिक सांडपाण्याचे नमुने घेऊन तपासले जात आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे तारापूर येथे ५० एमएलडी क्षमतेच्या नवीन सीईपीटीच्या प्रयोगशाळेत त्याचे पृथक्करण करून जलप्रदूषणाबरोबरच हवेचे प्रमाण मापदंडकानुसार कमी व जास्त आढळेल, त्या दोषी उद्योगांवर नोटिसी बजावून कारवाई करण्यात येणार आहे.