शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत मोबाइल टॉवर्सच्या कंपन्यांकडून १४ कोटी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:05 IST

वसई-विरार महापालिकेचा दणका; खजिन्यात भर, जनतेत समाधान

नालासोपारा : वसई विरार महापालिकेने शहरातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तीन अनधिकृत मोबाइल टॉवर्सवर कारवाई करून संबंधित कंपन्यांकडून १ कोटी ८० लाखांची रक्कम वसूल करण्यात आली असून आतापर्यंत महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये १४ कोटी ४५ लाख रुपये जमा झाले आहेत.मार्च २०१९ मध्ये रिलायन्स जियो कंपनी व मे २०१९ मध्ये इंडस मोबाइल टॉवरकडून मोबाईल टॉवरच्या करापोटी १२.६५ कोटी रुपये पालिकेने या आधीच वसूल केले होते. त्याचप्रमाणे बुधवारी पालिकेच्या करवसुली विभागाच्या पथकाने एटीसी कंपनीकडून मोबाइल टॉवरच्या करापोटी येणे बाकी असलेले १ कोटी ८० लाख रु पयांची रक्कम धनादेशाद्वारे वसूल केली.वसई विरार महापालिका क्षेत्रात एकूण ५४३ मोबाईलचे टॉवर्स आहेत. त्यामध्ये फक्त २६ मोबाईल टॉवर्स अधिकृत असून बाकीचे उरलेले अनधिकृत आहेत. एकूणच महापालिका स्थापन झाल्यापासून पालिका हद्दतील मोबाईल टॉवर कंपनीकडून कर वसुलीची कार्यवाही मोठ्या प्रमाणात प्रलंबित होती. त्यावेळी पालिकेच्या मोबाईल टॉवर मालमत्ता कर थकबाकीसाठी पालिकेचे अतिरीक्त आयुक्त संजय हेरवडे व स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी एक बैठक घेऊन मालमत्ता कर विभागाचे सहा. आयुक्त विश्वनाथ तळेकरांना मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मोबाईल टॉवरवरील कर आकारणी करणे कामी या पथकाने वरिष्ठांच्या निर्देशानुसार एक अ‍ॅक्शन प्लान तयार करून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या अ‍ॅक्शन प्लॅन पथकात सहाय्यक आयुक्तांसह अधिकारी भावेश पाटील, मनोज पाटील व कुमार पिलेना आहेत. सततच्या पाठपुराव्यानंतर मोबाइल टॉवरवर मालमत्ता कराची आकारणी करण्यात आली.वसई तालुक्यात अनधिकृत मोबाईल टॉवर उभारलेल्या कंपन्यांना महापालिकेने नोटीसा व देयकांची बिले बजावली आहेत. त्यानुसार कर वसूल करण्याचे काम सुरु आहे.-विश्वनाथ तळेकर, सहाय्यक आयुक्त, कर संकलन विभाग, वसई विरार शहर महानगरपालिका

टॅग्स :Vasai Virarवसई विरार