शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अंकुश राज हत्या प्रकरणात ११ महिन्यांनी १२ वा आरोपी अटकेत 

By धीरज परब | Updated: December 11, 2023 19:41 IST

फरार असलेल्या आरोपीला ११ महिन्या नंतर पकडण्यात मीरारोड पोलिसांना यश आले आहे.

मीरारोड - मीरारोडच्या जांगीड सर्कल ह्या गजबजलेल्या ठिकाणी अंकुश राज ह्या २० वर्षीय तरुणाची जानेवारी महिन्यात टोळक्याने हत्या केल्या प्रकरणी फरार असलेल्या आरोपीला ११ महिन्या नंतर पकडण्यात मीरारोड पोलिसांना यश आले आहे. ह्या गुन्ह्यात एकूण अटक आरोपींची संख्या १२ झाली असून आणखी दोघा आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. मीरारोडच्या शिवार उद्यान जवळ क्वीन्स पार्क भागात राहणाऱ्या अंकुश चा नातलग हर्ष राज याचे व आयुष भानुप्रताप सिंग (२०) रा . काशीगाव यांच्यात मीरागाव येथील पेट्रॉप पंप वर पेट्रोल भरण्याच्या नंबर वरून भांडण झाले होते. नंतर हर्ष ने आयुषला कड्याने मारल्याने तेव्हा अंकुश तेथे होता. बदला घेण्यासाठी आयुषने त्याच्या साथीदारांना बोलावून घेत एमटीएनल मार्ग व जांगीड सर्कल दरम्यान  मीरा दर्शन इमारत येथील एका दुचाकी दुरुस्तीच्या गॅरेजवर अंकुश गाठले. अंकुश याला बेदम मारहाण करून चाकू ने त्याची हत्या करण्यात आली . भर सायंकाळी एका टोळीने केलेल्या ह्या हत्याकांडा मुळे खळबळ उडाली . पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी तातडीने आरोपीना पकडण्यासाठी मार्गदर्शन करत गुन्ह्याचा आढावा घेतला . त्यावेळी गुन्हे शाखा कक्ष १ , मीरारोड व काशीमीरा पोलिसांनी काही तासात आयुष सह त्याच्या ९ साथीदारांना अटक केली होती. 

उपायुक्त जयंत बजबळे,  सहाय्यकआयुक्त महेश तरडे व मीरारोड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक  चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षकराहुलकुमार पाटील , गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक निरीक्षक संतोष सांगवीकर व रामकृष्ण बोडके, उपनिरीक्षक किरण वंजारी सह प्रशांत महाले, प्रफुल्ल महाकुलकर, प्रदीप गाडेकर, बालाजी हरणे, परेश पाटील, तानाजी कौटे, शंकर शेळके , अथर्व देवरे यांच्या पथकाने ९ डिसेम्बर रोजी हत्येच्या गुन्ह्यातील १२ वा आरोपी  रोहितकुमार शंकर पासवान (२४ ) रा . म्हाडा बिल्डींग, माशाचा पाडा, काशीमीरा ह्याला घोडबंदर मार्गावरील चेणे पुला जवळून अटक केली. पासवान हा मूळचा बिहार असून तो त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांनी सापळा रचला होता . पासवान हा अंकुश याच्या हत्ये नंतर नालासोपारा भागात वास्तव्य करत होता. आणखी दोघा आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोडArrestअटक