शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
6
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
7
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
9
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
10
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
11
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
12
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
13
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
14
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
15
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
16
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
17
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
18
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
19
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
20
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप

१२६ शिक्षकांची चौकशी

By admin | Updated: May 25, 2016 04:34 IST

या जिल्हा परिषदेच्या तब्बल १२६ शिक्षकांनी वेतनवाढ आणि पदोन्नती लाटण्यासाठी सरकारी नियम धाब्यावर बसवून बी. एड आणि बीपीएडची बोगस पदवी मिळवण्याची गंभीर

- शशी करपे,  वसईया जिल्हा परिषदेच्या तब्बल १२६ शिक्षकांनी वेतनवाढ आणि पदोन्नती लाटण्यासाठी सरकारी नियम धाब्यावर बसवून बी. एड आणि बीपीएडची बोगस पदवी मिळवण्याची गंभीर बाब उघडकीस आली असून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून याप्रकरणाची सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी तत्कालीन केंद्रप्रमुख आणि कार्यालयीन प्रमुखांचीही चौकशी केली जाणार आहे. वसई तालु्नयातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील तब्बल १२६ शिक्षकांनी अनेक करामती करून बी. एड आणि बीपीएडची बोगस पदवी संपादन करून पदोन्नती आणि वेतनश्रेणी लाटल्याची सविस्तर बातमी २३मे२०१६ च्या अंकात प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी वसई पंचायत समितीच्यागटशिक्षणाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करून येत्या १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त करण्यासाठी संबंधित कॉलेज मध्ये राहणे अनिवार्य असते. त्यामुळे ज्या शिक्षकांनी बी. एड, बी.पी.एड पदवी मिळवण्यासाठी ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. त्या कॉलेजकडून संबंधितांची उपस्थिती प्रमाणपत्र घेण्याचे निर्देशही गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर पदवी घेतलेल्या काळात संबंधित शिक्षक शाळेत कामावर हजर होते का? याबाबतही सविस्तर माहिती देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.उच्च शैक्षणिक पदवी मिळवण्यासाठी संबंधितांनी आवश्यक परवानगी घेतलेली नाही, घेतलेल्या रजेची सेवा पुस्तकात नोंद केलेली नाही आणि पदवी मिळवण्यासाठी आवश्यक तितकी रजा घेतलेली नाही असा ठपकाही शिक्षणाधिकाऱ्यांनी ठेवला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या अडचणी वाढल्या आहेत.याप्रकरणात संबंधित शिक्षकांना तत्कालीन केंद्र प्रमुख आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांची साथ मिळाल्याचा संशय असल्याने या सर्वांना नोटीसा बजावून त्यांच्याकडून लेखी खुलासे मागविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ही सर्व चौकशी येत्या १५ दिवसात पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याने शिक्षकांच्या पदवी मिळविण्याच्या करामतीबाबत लवकरच मोठा खुलासा होणार आहे.