शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

१२२ कोटींचा घोटाळा विधानपरिषदेत; ४८ आमदारांनी विचारला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:04 IST

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

नालासोपारा : २ मार्च २०१९ ला विरार पोलीस ठाण्यात वसई विरार शहर महानगरपालिकेच्या २५ कंत्राटदारांनी ३१६५ ठेका कर्मचाऱ्यांचे पगार, वैद्यकीय भत्ता, घर भत्ता यांचे १२२ कोटी रुपये हडप केले म्हणून मनोज पाटील यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर वसई तालुक्यात खळबळ माजली होती. या घोटाळ्याला वाचा फोडण्यासाठी लोकमतमध्ये अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध केल्या व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. पण गेंड्याच्या कातडीचे पालघर पोलीस प्रशासन आणि वसई विरार महानगरपालिकेचे अधिकारी यांना या कामगारांचे काहीही सोयरसुतक नव्हते. इतका मोठा घोटाळा करून कंत्राटदार गुन्हा दाखल झालातरी मोकाट व बिनधास्त वसई तालुक्यात वावरत होते. पण अखेर हा १२२ करोडचा घोटाळा विधानपरिषदेत ४८ आमदारांनी प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने गाजला आणि मुख्यमंत्र्यांनी कोकण आयुक्तांना चौकशी करून तीन महिन्यात अहवाल देण्यासह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यावर गरीब कामगारांना आता तरी न्याय मिळेल अशी आशा वसईतील जनतेला वाटू लागली आहे.वसई-विरार महापालिकेतील ठेका कर्मचाºयांची कंत्राटदार व महानगरपालिकेचे अधिकारी यांनी केलेली लूट तसेच शासन कराची चोरी असे एकूण १२२ करोड रुपयाच्या घोटाळ्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याविषयी व त्यावरील कारवाईसंबधी प्रश्न विधान सभेमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, छगन भुजबळ, विश्वजित कदम, संजय केळकर, पास्कल धनारे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, भास्कर जाधव व इतर अशा एकूण ४८ आमदारांनी विधानसभेमध्ये उपस्थित केला होता.त्याला दिलेल्या लेखी उत्तरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांना सखोल चौकशीचे व तीन महिन्यात यासंबधी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून चौकशीअंती दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.नेमके काय होते प्रकरणवसई विरार मनपाच्या ३१६५ ठेका कर्मचाºयांचा पगार, वैद्यकीय भत्ता, घर भत्ता या ठेकेदारांनी हडप केला आहे. एकूण १२२ करोडच्या घोटाळ्यात २९ करोड ५० लाख रुपयाचा शासकीय महसूलचाही समावेश असून ९२ करोड ५० लाख रुपये कर्मचाºयांच्या पगाराचे आहेत. ठेका कर्मचाºयांच्या पगारावरच डल्ला मारल्या प्रकरणी मनोज पाटील यांच्या पाठपुराव्याने विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMuncipal Corporationनगर पालिका