शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराच्या कारणातून जि.प. व पं.स. सदस्यांत ‘फ्री-स्टाईल’

By admin | Updated: May 25, 2017 00:59 IST

पोटनिवडणुकीत प्रचाराच्या वादातून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यामध्ये झालेली फ्री-स्टाईल शहरात चर्चिली जात आहे.

सिंदी (मेघे) चा प्रकार : रामनगर पोलिसांत गुन्हालोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पोटनिवडणुकीत प्रचाराच्या वादातून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यामध्ये झालेली फ्री-स्टाईल शहरात चर्चिली जात आहे. ही घटना सिंदी (मेघे) ग्रा.पं. अंतर्गत मंगळवारी रात्री ११.३० वाजता घडली. या घटनेमुळे सिंदी (मेघे) येथील पोटनिवडणुकीला गालबोट लागले आहे. ग्रा.पं. निवडणुकीत उमेदवाराचा प्रचार का करीत नाही, या कारणावरून जि.प. सदस्याने पं.स. सदस्याला मारहाण केली. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सिंदी (मेघे) परिसरातील थूल ले-आऊट येथील पं.स. सदस्यांचे घर गाठत केला. याबाबत पं.स. सदस्य प्रशांत भगत यांनी रामनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून सिंदी (मेघे) चे जि.प. सदस्य मनीष फुसाटे, कपील चंदनखेडे, प्रफुल्ल शेंडे, मंगेश रामटेके, निशांत सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रानुसार, सिंदी (मेघे) ग्रा.पं. ची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भीम टायगर सेनेचा कार्यकर्ता असलेला नितीन कुंभारे हा उमेदवार आहे. निवडणुकीत प्रशांत भगत हे कुंभारे यांचा प्रचार का करीत नाही, यावरून मनीष फुसाटे यांच्याशी शाब्दीक चकमक झाली होती. दरम्यान, फुसाटे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह भगत यांचे घर गाठले. त्यांना घराबाहेर बोलवून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर प्रचार केला नाही तर जीवानिशी ठार करू, अशी धमकी दिली. याबाबत भगत यांनी रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरूद्ध भादंविच्या कलम १४३, १४८, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.