शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शाळांना व्यावसायिक दराने वीज पुरवठा

By admin | Updated: July 25, 2016 02:00 IST

महावितरणने जि.प. शाळांना घरगुती दराने वीज पुरवठा करणे गरजेचे आहे; पण तसे होताना दिसत नाही.

बिल भरताना तारांबळ : अनुदान वाढविणे गरजेचे सेलू : महावितरणने जि.प. शाळांना घरगुती दराने वीज पुरवठा करणे गरजेचे आहे; पण तसे होताना दिसत नाही. जि.प. शाळांना व्यावसायिक दराने वीज पुरवठा होत असल्यानेच बिल अधिक येत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे वीज बिल भरताना व्यवस्थापन व मुख्याध्यापकांची तारांबळ उडते. याकडे लक्ष देत किमान अनुदान वाढवून द्यावे, अशी मागणी होत आहे. जि.प. उच्च प्राथमिक शाळा वघाळा (तुळजापूर) येथील शाळेला दरमहा १ हजार ७०० रुपये देयक येत आहे. महावितरणचे कर्मचारी शाळा बंद असताना लॉक रिडींग म्हणून तपासून बिल देतात. उच्च प्रा. शाळा वघाळा व प्राथमिक शाळा तुळजापूर येथे वर्षभरापासून हा प्रकार सुरू आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राथमिक शाळा तुळजापूरला देखभाल अनुदान दहा हजार रुपये तर जि.प. उच्च प्रा. शाळा वघाळालाही तेवढेच अनुदान येते. यात शाळेचा कोणता खर्च भागवावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांना हा खर्च स्वत: करावा लागतो. शिवाय विद्युत उपकरणे बंद ठेवावी लागत आहेत. हे तुटपुंजे अनुदान सर्व शिक्षा अभियानांतर्गत स्टेशनरी, रंगरंगोटी, जुजबी खर्च, वर्तमान पत्र, वीज बिल अशा १२४ बाबींवर खर्च करता येतो; पण यात अनेक बाबी महत्त्वाच्या असल्याने तो निधी पूरेसा नाही. जि.प. शाळांतील कर्मचाऱ्यांना वेतनाच्या चार टक्के सादील अनुदान दिले जाते; पण तेही वेळेवर मिळत नसल्याने या रक्कमेवर अवलंबून राहता येत नाही. त्यातही हे अनुदान कोणत्या बाबीवर खर्च करावे, याची बंधने घालून दिली आहेत. अनुदान व देखभाल खर्चाचा कुठेही ताळमेळ बसत नसल्याने शाळा डबघाईस येत आहे. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण बंधनकारक करण्यात आले असले तरी बिल अधिक येण्याच्या शक्यतेने संगणक, ई-लर्निंग, पंखे, लाईट बंद ठेवावे लागत आहेत. यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत आहे. याच प्रकारांमुळे शाळेची पटसंख्या घटत आहे. गतवर्षी जि.प. वघाळा शाळेची पटसंख्या १२० होती. आता ती ७७ राहिली आहे. वघाळा व तुळजापूर याचा वीज भार देयक औद्योगिकमध्ये टाकले आहे. महावितरणने शाळांना ग्राहक श्रेणी बीपीलएचे दर लावणे गरजेचे आहे. परिणामी, शिल्लक निधीतून शाळेच्या विकासाला हातभार लागू शकतो. शिवाय शाळांच्या सर्वांगिण विकासाकरिता अनुदान रकमेत वाढ करावी. महावितरण व शिक्षण विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)