शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. सभापती व उपसभापतींनी घेतला वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 22:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : पंचायत समिती आर्वी अंतर्गत माटोडा (बेनोडा) शाळेत एक शिक्षक व एक शिक्षिका असताना ते प्रार्थनेच्या वेळी उपस्थित राहत नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. यावरून जि.प. शिक्षण सभापती जयश्री गफाट व पं.स. उपसभापती धर्मेंद्र राऊत यांनी आकस्मिक भेट दिली. यावेळी सर्व प्रकार उघडकीस आला. १०.३० पासून उपस्थित विद्यार्थ्यांची ...

ठळक मुद्देशिक्षकांची अनुपस्थिती : दोन्ही शिक्षकांना निलंबित करण्याची ग्रामस्थांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : पंचायत समिती आर्वी अंतर्गत माटोडा (बेनोडा) शाळेत एक शिक्षक व एक शिक्षिका असताना ते प्रार्थनेच्या वेळी उपस्थित राहत नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. यावरून जि.प. शिक्षण सभापती जयश्री गफाट व पं.स. उपसभापती धर्मेंद्र राऊत यांनी आकस्मिक भेट दिली. यावेळी सर्व प्रकार उघडकीस आला. १०.३० पासून उपस्थित विद्यार्थ्यांची प्रथम प्रार्थना घेऊन नंतर त्यांनी क्लास घेतला.प्राप्त माहितीनुसार, आर्वी पं.स. अंतर्गत येणाºया माटोडा (बेनोडा) येथील जि.प. शाळेत मुख्याध्यापक नासीर मुल्ला व सहायक शिक्षिका खोडे नेहमीच अनुपस्थित राहतात, अशा अनेक तक्रारी जि.प. शिक्षण सभापती व पं.स. उपसभापती यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत शनिवारी दोन्ही पदाधिकाºयांनी आकस्मिक भेट दिली. यावेळी दोन्ही शिक्षक अनुपस्थित असल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांची प्रार्थना घेतली व नंतर त्यांना शिकविले. काही वेळानंतर ११.२० वाजता शाळेचे मुख्याध्यापक नासीर मुल्ला व ११.३० वाजता शिक्षिका खोडे शाळेत उपस्थित झाल्या. याप्रसंगी सभापती व उपसभापतीकडे गावातील नागरिकांनी शाळेत येऊन तक्रारीचा पाढा वाचण्यास सुरूवात केली.तक्रारीमध्ये दोन्ही शिक्षक शाळेत वेळेवर येत नाहीत. आल्यावर जोराजोराने आपसात भांडतात. मुलांना व्यवस्थित शिकवित नाहीत. यामुळे शिक्षणाचा दर्जा अत्यंत खालावला आहे. तालुक्याला काम आहे म्हणून २ ते २.३० वाजताच्या सुमारास शाळेतून निघून जातात. अशा वेळी विद्यार्थी रामभरोसे असतात. कोणताही विद्यार्थी येथे शिक्षण घेऊ शकत नाही. यामुळे दोन्ही शिक्षकांची त्वरित बदली करावी तथा नासीर मुल्ला व खोडे यांना निलंबित करावे, असे नमूद करण्यात आले आहे. सभापती व उपसभापती यांच्यासोबत गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, समितीचे अध्यक्ष हेमराज तुमसरे, नागोराव चांभारे व अन्य उपस्थित होते.