शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. व पं. स. निवडणुकीतील उमेदवारांवर आज शिक्कामोर्तब

By admin | Updated: February 7, 2017 01:06 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वातावरण सध्या प्रचाराच्या वाऱ्यांनी तापत आहे.

अपक्षांना मिळणार चिन्ह : अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस वर्धा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वातावरण सध्या प्रचाराच्या वाऱ्यांनी तापत आहे. जे रिंगणात राहणार ते कामाला लागले आहेत; मात्र काहींनी नाराजीमुळे पक्षाशी बंडाळी केली तर काहींनी हौस म्हणून नामांकन दाखल केले. त्यांची मनधरणी पक्षाकडून सुरू आहे. या मनधरणीला कोण साद देत नामांकन परत घेतो आणि कोण रिंगणात दंड थोपटतो, हे उद्या मंगळवारी (दि.७) स्पष्ट होणार आहे. नामांकन परत घेण्याची उद्या अंतिम तारीख असून त्याच दिवशी अपक्षांना चिन्हही मिळणार आहे. नामांकन अर्ज दाखल झाल्यानंतर त्याची छाननी झाली. दाखल झालेल्या नामांकनापैकी ३३ नामांकन बाद ठरले. नामांकन अर्ज दाखल करताना काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या हातून झालेल्या चूका त्यांच्याच अंगलटी आल्या. यात अनेकांना फटका बसला. यावर काहींनी आक्षेप घेतला असून त्यावर चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. या सर्व घडामोडीनंतर आजच्या स्थितीत निवडणूक रिंगणात एकूण ९६३ उमेदवार आहेत. यात जिल्हा परिषदेचे ३५९ तर पंचायत समितीचे एकूण ५६७ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी कोण रिंगणात राहतो आणि कोण माघार घेतो यावर उद्या शिक्कामोर्तब होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समितीच्या १०४ जागांकरिता १६ फेबु्रवारीरोजी निवडणूक होणार आहे. यात वाढोणा आणि मोरांगणा या दोन गट आणि त्याअंतर्गत येत असलेल्या चार गणांकरिता दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यांच्याकरिता नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. असे असले तरी पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीची रंगत जिल्ह्यात सुरू झाली आहे. यात सर्वच राजकीय पक्षांनी त्यांचे उमेदवार रिंगणात उतरविले आहे. यात काहींनी एका पक्षाने उमेदवारी नाकरल्याने वेळीच दुसऱ्या पक्षाला हात देत उमेदवारी पदरात पाडून घेतली. त्यांचाही प्रचार सुरू झाला आहे. तर काहींनी पक्षाने तिकिट नाकरल्याने अपक्ष उमेदवारी दाखल करीत बंडखोरी केली. या बंडखोरांच्या मनधरणीकरिता राजकीय पक्षातील जिल्हास्तरावरील नेते लागले आहेत. शिवाय उमेदवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनही त्यांच्याशी संधान जोडणे सुरू केल्याची चर्चा आहे. यात त्यांना कितपत यश येते याचा खुलासा उद्याच होणार आहे. यात किती जण नामांकन परत घेतात आणि किती रिंगणात राहतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी) अनेकांना हवे आवडीचे चिन्हजिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता होणाऱ्या निवडणुकीत अनेक अपक्षांनी नामांकन दाखल केले. नामांकन अर्ज दाखल करतानाच त्यावर असलेल्या तीन चिन्हापैकी एका चिन्हाची निवड करण्याचा नियम आहे. यानुसार उमेदवारांनी त्यांना हव्या असलेल्या चिन्हाची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्जातूनच केली आहे. यात निवड केलेले आवडीचे चिन्ह मिळते अथवा वेळेवर दुसऱ्याच चिन्हावर निवडणूक लढवावी लागते याकडे उमेदवारांचे लक्ष आहे.