शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ ‘अनअपडेटेड’

By admin | Updated: August 4, 2016 00:34 IST

भारताने डिजिटल इंडियाचा नारा दिला आहे. प्रत्येक बाबीची तंत्रज्ञानावर तुलना होत आहे. तंत्रज्ञानाचे लोण शासनाच्या प्रत्येक विभागापासून जिल्हा परिषदेपर्यंत पसरले आहे.

आवश्यक माहितीचाच अभाव : अनेक दिवसांपासून संकेतस्थळ बॅकडेटमध्ये पराग मगर वर्धा भारताने डिजिटल इंडियाचा नारा दिला आहे. प्रत्येक बाबीची तंत्रज्ञानावर तुलना होत आहे. तंत्रज्ञानाचे लोण शासनाच्या प्रत्येक विभागापासून जिल्हा परिषदेपर्यंत पसरले आहे. त्यामुळे जिल्हास्तरावरही प्रत्येक जिल्ह्याचे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाची, तेथील कामकाजाची, विभागांची, अधिकारी व लोकप्रतिनिधींची, योजनांची माहिती यातून मिळावी, हा उद्देश असतो; पण वर्धा जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ याबाबतीत पूर्णत: अपयशी ठरले आहे. यामुळे हे संकेतस्थळ ‘अनअपडेटेड’ असल्याची प्रतिक्रिया संकेतस्थळाला भेट देणारे व्यक्त करतात. तंत्रज्ञानामुळे प्रत्येक बाब सोपी होत आहे. नागरिकांचा त्रास कमी व्हावा, शासनाद्वारे जि.प. व पं.स. स्तरावरील योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी संकेतस्थळ निर्माण केले जाते. जिल्हा स्तरावरील शासनाचे आदेश, आवश्यक सूचना आदीबाबत माहिती जि.प.च्या संकेतस्थळावर मिळावी, ही अपेक्षा असते; पण वर्धा जि.प. चे संकेतस्थळ ही अपेक्षा पूर्ण करण्यात कुचकामी ठरत आहे. या संकेतस्थळाला भेट देताना पहिली अडचण म्हणजे अनेकदा त्यात ‘एरर’ येऊन संकेतस्थळ उघडत नाही. एखाद्या विभागाबाबत माहिती हवी असल्यास ‘डिपार्टमेंट’ या शब्दावर ‘क्लिक’ केल्यास विभागांची यादी उघडते. एखाद्या विभागाची माहिती हवी असल्यास त्या नावावर ‘क्लिक’ करावे लागते. यानंतर कधीकाळी ‘स्कॅन’ करून टाकण्यात आलेली पाने ‘डाऊनलोड’ करावी लागतात. यात काही बदल करायचा असल्यास जि.प. प्रशासनालाही ते शक्य होत नाही. दुसरीच यादी टाकावी लागते. यामुळे नसलेले पदाधिकारी आजही कागदोपत्री विभागात कार्यरत दिसतात. युवकांना स्पर्धा परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाबाबत काही माहिती हवी असल्यास ते या संकेतस्थळाला भेट देतात; पण आवश्यक माहिती मिळत नसल्याची ओरड युवक करीत असतात.