शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

युवकाची निर्र्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:12 IST

येथील सिंदी ते भोसा मार्गावरील कॅनलच्या पुलावर युवकाची लोखंडी रॉडने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देएकास घेतले ताब्यात : सिंदी ते भोसा मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : येथील सिंदी ते भोसा मार्गावरील कॅनलच्या पुलावर युवकाची लोखंडी रॉडने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इकबाल अली तजबर अली (४०) असे मृताचे नाव आहे. तो गावातील मोठी मशिद परिसरात राहात होता. बुधवारी सायंकाळी ७ वाजता सिंदी-भोसा या मार्गाने जात असताना कॅनल पुलावर त्याला अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी मृतकाची दुचाकी पुलाखाली फेकून दिली तसेच त्याचा मृतदेहही बाजुला ओढत नेऊन कॅनलच्या रस्त्यावर टाकला. गुरुवारी सकाळी गौळ व भोसा येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांना हा मृतदेह दिसल्याने घटना उघडकीस आली. मृताची ओळख पटल्यानंतर गावातील प्रेमीला डफ यांनी मृताच्या घरी माहिती दिली. मृताच्या परिवाराने घटनास्थळ गाठून टाहो फोडला. मृतकाची पत्नी नजुमन इकबाल अली हिने पोलीस ठाण्यात जाऊन शेजारी राहणाºया सादिक शेख विरुद्ध तक्रार नोंदविली. त्याआधारे पोलिसांनी सादिकला विचारपूस करण्याकरिता ताब्यात घेतले. घटनास्थळी वर्ध्यावरुन ठसेतज्ज्ञ, श्वान पथक व न्यायवैद्यक प्रयोगशाळेची चमू दाखल झाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे यांच्यासह प्रभारी ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी पाहणी केली. पुढील तपास काटकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण भाकडे, मेघरे, जावेद, श्याम इवनाते, गजानन मस्के, अमोल पिंपळकर, सतीश हांडे, प्रकाश मैंद करीत आहेत.