शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

युवकांनी आपली उर्जा विधायक कार्यात लावून उंच झेप घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 22:07 IST

तरुण-तरुणी शिक्षण घेवून शाळा-महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर नोकरी शोधू लागतात. शाळा महाविद्यालयातून मिळणार शिक्षण हे व्यावसायाभिमुख असले पाहिजे.

ठळक मुद्देरामदास तडस : विशेष मार्गदर्शन कार्यक्रम

आॅनलाईन लोकमतपुलगाव : तरुण-तरुणी शिक्षण घेवून शाळा-महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर नोकरी शोधू लागतात. शाळा महाविद्यालयातून मिळणार शिक्षण हे व्यावसायाभिमुख असले पाहिजे. व्यावसायिक शिक्षण मिळाल्यास तरुण स्वत:चा व्यवसाय करू इच्छितो किंवा उद्योग उभा करू शकतो. सरकार व्यवसाय करणाऱ्यांना व उद्योग उभा करणाºयांना शासन आर्थिक मदत करते. तरुणांनी नोकरी मागणारे न बनता नोकरी देणारे बनावे. शिवाय त्यांनी आपली उर्जा विधायक कार्यात खर्च करावी, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.माहेश्वरी युवा संघटनेच्यावतीने आयोजित त्रि-दिवसीय उडान पारिवारीक कार्यक्रमाच्या समारोपीय प्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी गिमाटेक्स हिंगणघाट व्यवस्थापकीय संचालक प्रशांत मोहता, माहेश्वरी युवा संघटनेचे शरद मुंधडा, अध्यक्ष भूषण गांधी यांची प्रामुख्याने उपस्थिती होते.मार्गदर्शन करताना प्रशांत मोहता यांनी अनेक युवक आज व्यवसायिक व उद्योजक बनत आहेत. परंतु, उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी कार्यप्रणाली व माहिती कृतीत कशी उतरवावी हे आपल्यावर अवलंबून आहे. व्यवसायात अनेक महत्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतात. इतकेच नव्हे तर व्यवसायात येणारे आवाहने स्वीकारावी लागतात. त्यासाठी उद्योजकात खिलाडी वृत्ती व खेळाचे आकर्षण असणे गरजेचे आहे, असे सांगितले.सदर कार्यक्रमाचे यंदाचे हे तिसरे वर्ष होते. उद्घाटनपर कार्यक्रमाला आ. रणजीत कांबळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. तर दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाला नगराध्यक्ष शितल गाते, समाजसेवक प्रभाकर शहाकार, सरपंच सविता गावंडे यांच्या उपस्थिती होती. यावेळी राजीव गांधी मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते गौरविण्यात आहे. तर विशेष कार्यशाळेत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अशोक कोठारी यवतमाळ यांनी मार्गदर्शन केले. शेतकºयांसाठी कृषीविषयक मार्गदर्शन कार्यशाळेत डॉ. सूर्यप्रकाश मालानी व शिवाजी महाविद्यालय अमरावती येथील प्रा. दुर्गे यांनी मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमात खा. तडस यांच्या हस्ते संदीप ढोमणे, श्रीकांत राठी, भरतकुमार अग्रवाल, यांच्यासह संगम सेवा समिती, रामदेबाबा मंदिर, माहेश्वरी युवा संगठनच्या पदाधिकाºयांना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.संचालन गिरीराज मालपाणी यांनी तर आभार महेश चांडक यांनी मानले. कार्यक्रमाला न. प. उपाध्यक्ष आशीष गांधी, कमलकिशोर माहेश्वरी, ब्रिजमोहन मोहता, गौरव राठी, तुषार चांडक, शेखर पनपालिया, कमल गांधी, पलाश चांडक, योगेश भट्टड, यांचेसह माहेश्वरी मंडळ, युवा संगठनच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.