शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तरूणांनी ज्ञानार्थी असावे

By admin | Updated: October 9, 2014 23:07 IST

जी गोष्ट माहीत नसते ती माहीत करून घेणे म्हणजे ज्ञान प्राप्ती होय. स्वत: ज्ञानी होऊन प्राप्त झालेले ज्ञान इतरापर्यंत पोहचविणे हे सर्वश्रेष्ठ कार्य, नोकरी मिळविणे हा शिक्षणाचा उद्देश असू नये तर

नवनीत देशमुख : वाचनातून होते विचारांची निर्मितीवर्धा : जी गोष्ट माहीत नसते ती माहीत करून घेणे म्हणजे ज्ञान प्राप्ती होय. स्वत: ज्ञानी होऊन प्राप्त झालेले ज्ञान इतरापर्यंत पोहचविणे हे सर्वश्रेष्ठ कार्य, नोकरी मिळविणे हा शिक्षणाचा उद्देश असू नये तर सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेऊनच शिक्षणाकडे वळायला हवे. ज्ञानार्थी व्यक्तीला पोटाची चिंता बाळगण्याची गरज नस्ते, परिश्रम कधीच वाया जात नाही, तरूणांना प्रेरणा देण्याचे सामर्थ्य साहित्यात असून याकरिता वाचन करावयास हवे, असे विचार कथाकार प्रा. नवनीत देशमुख यांनी व्यक्त केले. पिपरी (मेघे) येथील जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालयात मराठी अभ्यास मंंडळाच्या कार्यक्रमात प्रमुख मारगदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य व लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. पुरूषोत्तम कालभूत, उपप्राचार्य प्रा. सुरेश पवार, मराठी विभाग प्रमुख प्रा. राजेश देशपांडे व मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष वीणालाल उपरीकर उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे मराठी अभ्यास मंडळ गठित करण्यात आले. तसेच विद्यार्थी व अभ्यास मंडळाच्या कार्यकारीणीतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर प्रा. देशमुख यांनी प्रवास ही कथा सादर केली. यानंतर बोलताना डॉ. कालभूत म्हणाले, समाजातील प्रत्येक चांगल्या व वाईट गोष्टींची नोंद साहित्यात होत असते. साहित्य हा समाजजीवनाचा आरसा असतो, विद्यार्थी हे समाजाचे भविष्य असते, आपले भविष्य उज्वल करण्याकरिता विद्यार्थ्यांनी ज्ञानप्राप्तीची कास धरावी, शिक्षणाचा वापर यशप्राप्ती तसेच व्यक्तिमत्वाच्या विकासाकरिता करावा, असे आवाहन केले. तसेच प्रा. सुरेश पवार यांनी मार्गदर्शन केले. यानंतर मराठी विभाग प्रमुखांनी मंडळाची भुमिका विशद केली. तसेच मंडळाकडून राबवित असलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. राजेश देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली मसने यांनी केले तर आभार प्रदर्शन वीणालाल उपरीकर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजनाला सदस्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)