शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

योजना पोहचविण्यासाठी युवा माहिती दूत महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 21:38 IST

शासन नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. शासनाच्या या योजना ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात युवा माहिती दूत मोलाची भूमिका बजावतील, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केले.

ठळक मुद्देप्रकाश मेहता : युवा माहिती दूत उपक्रमाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासन नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. शासनाच्या या योजना ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात युवा माहिती दूत मोलाची भूमिका बजावतील, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केले.शासकीय मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात शासनाच्या युवा माहिती दूत उपक्रमाचा शुभारंभ बुधवारी महेता यांच्या हस्ते लोगोचे अनावरण करून करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात या उपक्रमाची ध्वनिचित्रफित उपस्थितांना दाखविण्यात आली. यावेळी महेता बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, पोलीस अधीक्षक बसवराज तेली. सहाय्यक जिल्हाधिकारी जिंदाल, निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शाह, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. करूणा जुईकर, माजी खासदार सुरेश वाघमारे, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, प्रशासकीय अधिकारी व नागरिक उपस्थित होते.युनिसेफच्या सहयोगाने तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विविध व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती लाभार्थीपर्यंत थेटपणे पोहचविणे हे युवा माहिती दूत उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार हा मुख्यत्वे वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेडिओ तसेच पारंपारिक लोककलेच्या माध्यमातून केला जातो. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत न पोहचणाºया शासकीय योजना माहिती थेट त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी राज्यातील समाजकार्याची आवड असलेल्या उत्साही तरूण वर्गाचे सहाय्य घेण्याचा युवा माहिती दूत या उपक्रमाचा महत्वाचा उद्देश आहे. कार्यक्रमात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत तयार करण्यात आलेली माहिती दूत उपक्रमाबाबत माहिती देणारी चित्रफित दाखविण्यात आली.

टॅग्स :Prakash Mehtaप्रकाश मेहता