शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

युवकाला दोराने बांधून मारहाण

By admin | Updated: September 12, 2016 00:43 IST

खरांगणा पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या टेंबरी (परसोडी) येथील महिलेची छेडछाड केल्याच्या वादातून पाच जणांनी एकाला दोराने बांधून मारहाण केली.

छेड काढल्याचे प्रकरण : पाच जणांवर गुन्हाआकोली : खरांगणा पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या टेंबरी (परसोडी) येथील महिलेची छेडछाड केल्याच्या वादातून पाच जणांनी एकाला दोराने बांधून मारहाण केली. यात सदर युवक गंभीर जखमी झाला आला. त्याच्या आईने केलेल्या तक्रारीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस बाबाराव मरस्कोल्हे असे जखमी झालेल्या युवकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार, गुन्हा दाखल असलेल्या पाच जणांपैकी एकाची पत्नी विरूळ (आकाजी) येथे गेली होती. परत येताना तेजसने या महिलेला दुचाकीवर आणले. गावाजवळ दुचाकी येताच तिला कवटाळल्याची तक्रार महिलेने पोलिसात केली. याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी तेजस मरस्कोल्हे याच्यावर भादंविच्या कलम ३५४ (अ) अन्वये विनयभांगाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होवूनही आरोपीला अटक करण्यात आली नाही. तो गावात फिरत असल्याचे म्हणत पाचही जणांनी त्याचा वचपा काढण्याचे ठरविले. यानुसार शनिवारी रात्री तेजस हा पाणटपरीकडे जात असताना आरोपीने तु माझ्या पत्नीची छेड का काढली असे म्हणत वाद घातला. यात राजेंद्र पंढरे, साहिल पंढरे, विक्की बैस, बंटी बैस, बबलू घरकिल्ले यांनी त्याला दोराने बांधून मारहाण केली. यात तेजस गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती घरच्यांना कळताच त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी तेजसच्या आईने खरांगणा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून या पाचही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार प्रशांत पांडे यांच्या मार्गदर्शनात जमादार शेंडे, दिनेश गायकवाड यांच्यासह पोलीस करीत आहेत.(वार्ताहर)