शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही फक्त रद्दी द्या, आम्ही नव्या कोऱ्या वह्या देऊ; वर्ध्यातला अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 13:25 IST

सामाजिक दायित्वातून विद्यादानाचे पुण्य कमाविण्यासाठी नागरिकांकडून रद्दी घेऊन विद्यार्थ्यांना वह्या देण्याचा उपक्रम गांधी सिटी रोटरी क्लबने हाती घेतला आहे.

ठळक मुद्देगांधी सिटी रोटरी क्लबचा पुढाकारस्टार्ट अप इंडिया अंतर्गत राज्यभर राबविणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शाळेत नाव टाकल्यानंतर शाळेकडून विद्यार्थ्यांना पुस्तक पुरविले जातात. परंतु पालकांना वह्यांवरही मोठा खर्च करावा लागतो. काहींना हा खर्चही झेपावत नाही म्हणून सामाजिक दायित्वातून विद्यादानाचे पुण्य कमाविण्यासाठी नागरिकांकडून रद्दी घेऊन विद्यार्थ्यांना वह्या देण्याचा उपक्रम गांधी सिटी रोटरी क्लबने हाती घेतला आहे. स्टार्ट अप इंडियाअंतर्गत यावर्षी हा उपक्र म राज्यभर राबविला जाणार आहे.समाजातील प्रत्येक घटकांना आपली मुले शिकली पाहिजे, अशी रास्त अपेक्षा असते. परंतु, परिस्थितीअभावी शिक्षण घेता येत नाही. शासनाकडून मोफत शिक्षणाची व्यवस्था केली असली तरी बाबींची पूर्तता करण्याचीही काही पालकांची परिस्थिती नाही. याचीच जाणीव ठेवून गांधी सिटी रोटरी क्लबद्वारे लोकसहभागातून ‘आपण फक्त रद्दी घ्या, आम्ही नव्या कोºया वह्या देऊ’ हा उपक्रम हाती घेतला आहे. कुणालाही आर्थिक मदत न मागता आपल्या घरातील वह्या, पुस्तके व वर्तमानपत्रांची रद्दी स्वीकारून त्या रद्दीच्या मोबदल्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पुरविल्या जाणार आहेत. रद्दी गोळा करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून २२ जूनपासून शाळा लागल्यानंतर प्रत्येक शाळेत सर्वांच्या सहकार्याने नव्या कोऱ्या वह्या वितरित करण्यात येणार आहेत.

संपर्क साधल्यास घरूनच रद्दी गोळा करणारपूर्वी वस्तूच्या मोबदल्यात वस्तू असाच व्यवहार सुपरिचित होता. काळ बदलला, संदर्भ बदलले. रोटरी क्लब आॅफ गांधी सिटीच्या वतीने ‘रद्दी द्या आणि नव्या कोºया वह्या घ्या’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांनी आपल्या घरातील रद्दी देण्यासाठी स्थानिक रोटरी क्लबच्या सदस्यांशी संपर्क साधल्यास तेच सदस्य घरुन रद्दी गोळा करणार आहे. सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ७.३० वाजतापर्यंत रद्दी संकलित केली जाते. त्यामुळे दात्यांनी या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुरविण्यासाठी रोटरी क्लबद्वारा हा उपक्रम सुरू केला असून राज्यभर राबविला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रोटरी क्लबच्या सदस्यांशी संपर्क साधून आपल्या घरातील रद्दी द्यावी. ही रद्दी वह्या बनविणाऱ्या कंपनीला दिली जाईल. त्याच्या मोबदल्यात कंपनीकडून वह्या घेतल्या जाणार आहेत.डॉ. श्रीनिवास लेले, अध्यक्ष, गांधी सिटी रोटरी क्लब, वर्धा

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र