शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

‘कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक’ने घेतला ठाव

By admin | Updated: February 5, 2016 01:43 IST

शेतकऱ्यांची वेतना ही देशव्यापी असून शेतीत राबणाऱ्या हातांनी आता शोषण करणाऱ्या व्यवस्थेविरोधात दोन हात करायला शिकले पाहिजे,

इंद्रजित भालेराव यांचे काव्यगायन रंगले : दाते स्मृती व्याख्यानमालेतील उपक्रमवर्धा : शेतकऱ्यांची वेतना ही देशव्यापी असून शेतीत राबणाऱ्या हातांनी आता शोषण करणाऱ्या व्यवस्थेविरोधात दोन हात करायला शिकले पाहिजे, अशी भूमिका मांडत ‘शिक बाबा शिक लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायाला शिक’, असे आवाहन शेतकऱ्यांचा कवी म्हणून महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या परभणीचे इंद्रजित भालेराव यांनी केले. यशवंतराव दाते स्मृती संस्था आयोजित व्याख्यानमालेच्या द्वितीय सत्रात त्यांच्या काव्यगायनाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात तब्बल दोन तास रंगलेल्या या काव्यगायन कार्यक्रमात आपला जीवनपट उलगडून दाखवितानाच दर्जेदार व लयबद्ध कवितांनी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी रसिकांना भुरळ घातली. आजच्या कवींनी शेतकरी आणि गाव, हे विषय विनोदाचे केले आहेत. महात्मा फुल्यांचा शेतकरी अजूनही कवितेतून व्यक्त होत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी, मंचावर संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, प्रा. शेख हाशम, संजय इंगळे तिगावकर, डॉ. स्मीता वानखेडे आदी उपस्थित होते. ‘पाखरं असली तरी ती ओळखायच्या बापाच्या मनातील भाव, सुगी संपली तरी चिमण्या सोडत नसायच्या गाव’ ही परिस्थिती आता बदलत चालली आहे. गांधींनी दिलेला ‘गावाकडे चला’ हा संदेश गावे स्वयंपूर्ण व स्वावलंबी व्हावीत या उद्देशाने होता, असे सांगून भालेराव यांनी, ‘काट्याकुट्यांचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता’, ‘शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची छाप, तिथे राबतो कष्टतो, माझा शेतकरी बाप’ आदी कविता सादर केल्या. ‘पंतप्राधन म्हणाले की, शेतकऱ्याला आपल्या देशाचे नियोजन करता येत नाही, म्हणून शेतकरी आत्महत्या करतात. शेतकरी म्हणाले, आतापर्यंत या देशाचे नियोजन जमले नाही, म्हणून किती पंतप्रधानांनी आत्महत्या केल्या? असा प्रश्न उपस्थित करीत ‘मरायला नाही आता मारायला शिक, शिक बाबा शिक जगायला शिक’ हा आपल्या कवितेचा धागा पुढे नेला. त्यांनी ‘एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भालाफेक’ हे गीत सादर केले आणि उपस्थितांनीही गाण्यासोबत ठेका धरला. संचालन डॉ. स्मीता वानखेडे यांनी केले. प्रास्ताविक संजय इंगळे तिगावकर यांनी केले तर आभार प्रदीप दाते यांनी मानले. यावेळी डॉ. किशोर सानप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मडावी, सुनील राऊत, डॉ. शिरीष गोडे, प्राचार्य डॉ. विलास देशमुख, प्राचार्य रोंघे, प्रा. कोंगरे, डॉ. कोटेवार, अभ्युदय मेघे, मधुकर इंगळे, जयंत साळवे, अशोक चौधरी, प्रा. राजेंद्र गावंडे, प्रा. डी.के. देशमुख, शेषराव बिजवार, पंडित देशमुख, लक्ष्मीनारायण सोनवणे, माहिती सहायक श्याम टरके, डॉ. खंडारे, प्रा. किशोर वानखडे, मीना कारंजेकर, मुरलीधर बेलखोडे, डॉ. तारक काटे, भाऊ थोटे, प्रकाश येंडे, डॉ. दीपक पुनसे, रंजना दाते, प्रा. राजेंद्र मुंढे, डॉ. विजय बोबडे, डॉ. ना.ह. खोडे, प्रा. एकनाथ मुरकुटे, प्रा. प्रमोद नारायणे, गौरीशंकर टिबडेवाल, दिलीप कठाणे, वसंत जळीत, प्रा. काळे, गुणवंत डकरे, नंदकुमार वानखेडे आदी साहित्यप्रेमी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)