शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

साडे चार एकर केळीच्या बागेतून २२.८४ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:09 IST

पारंपरिक पिके सोडून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे. यातूनच युवा शेतकरी अन्य शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण करीत असल्याची उदाहरणे आहेत. सध्या पवनार येथील युवा शेतकऱ्याने केवळ साडेचार एकर शेतात तब्बल २२ लाख रुपयांचे उत्पादन घेत विक्रमच केला आहे.

ठळक मुद्दे २८ किलो वजनाचा एक घड : पवनार येथील शेतकऱ्यांचे धाडस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पारंपरिक पिके सोडून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे. यातूनच युवा शेतकरी अन्य शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण करीत असल्याची उदाहरणे आहेत. सध्या पवनार येथील युवा शेतकऱ्याने केवळ साडेचार एकर शेतात तब्बल २२ लाख रुपयांचे उत्पादन घेत विक्रमच केला आहे. या शेतकऱ्यांने केळीची बाग फुलविली आहे.पवनार येथील शेतकरी कुंदन वाघमारे यांनी ५ मार्च २०१७ रोजी आपल्या साडे चार एकर शेतात केळीची लागवड केली होती. केळीचा बागायतदार तालुका म्हणून ओळख असलेल्या सेलूतून केळीचे पीक हद्दपार झाल्याची ओर होत आहे. असे असताना वाघमारे यांनी पवनार येथील आपल्या शेतात केळीची बाग तयार करण्याची किमया साध्य केली आहे. अकरा महिने परिश्रम घेतल्यानंतर त्यांना विक्रमी उत्पादन घेता आले आहे. सध्या त्यांच्या साडे चार एकर शेतात केळीची ६ हजार ८०० झाडे आहेत. प्रत्येक झाडाला केळीचे घड लागलेले आहेत. एका घडाचे वजन सुमारे २८ किलो झाले आहे. सध्या बाजारपेठेत केळीच्या घडाला १२ रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहेत. एकूण हिशेब लक्षात घेतला तर त्यांना तब्बल २२ लाख ८४ हजार रुपयांचे उत्पन्न या साडे चार एकर शेतातून मिळणार आहे.शेतकºयांनी आधुनिक शेती केल्यास उत्पादन व जीवनमान उंचावता येते, हे वाघमारे यांनी सिद्ध केले आहे. पारंपरिक पिकांची कास धरून त्यांना केवळ साडे चार एकर शेतात कधीही एवढे उत्पन्न घेता आले नसते; पण केळीची बाग फुलविण्याचे धाडस केल्याने केवळ वर्षभरात त्यांना २२ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होऊ शकले आहेत. वाघमारे यांनी शासकीय नोकरी सोडून शेती पत्करली; पण अन्य शेतकरी पारंपरिक पिकांवरच भर देत असल्याने नापिकीचा सामना करावा लागतो. अन्य शेतकऱ्यांनी सुविधा प्राप्त करून घेत आधुनिक शेतीची कास धरणे गरजेचे झाले आहे.प्रयोगशीलता हवीपारंपरिक पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्याला फारसे उत्पन्न मिळत नाही; पण शेतीत प्रयोगशीलता गरजेची आहे. विविध प्रयोग राबवून व्यवसाय म्हणून शेती केल्यास शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून जीवनमान उंचाविणे शक्य होऊ शकते. यामुळे शेतकºयांनी अनुकरण करणे गरजेचे आहे.