शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

‘हां बाबू ये सर्कस है, शो तीन घंटे का़़़’

By admin | Updated: March 30, 2015 01:46 IST

हत्ती, घोडे, सिंह, वाघ, अस्वल यांची पिंजऱ्यासह सवारी, गाड्यांवर कलावंत, ‘चल मेरे हाथी’च्या सुरात वाद्यवृंद, जाहिरातीचे फलक अशी मिरवणूक निघाली की सर्कस आल्याचे कळत होते;

प्रभाकर शहाकार पुलगावहत्ती, घोडे, सिंह, वाघ, अस्वल यांची पिंजऱ्यासह सवारी, गाड्यांवर कलावंत, ‘चल मेरे हाथी’च्या सुरात वाद्यवृंद, जाहिरातीचे फलक अशी मिरवणूक निघाली की सर्कस आल्याचे कळत होते; पण आज वॉट्स अ‍ॅप, टष्ट्वीटर, फेसबुकच्या युगात अशा मिरवणुका बंद झाल्या असून केवळ हायटेक प्रचार सुरू झाला आहे. सर्कसमधील प्राण्यांच्या खेळांवर बंदी आली़ यामुळे सर्कस प्रेमी निराश झाले़ प्राण्यांच्या गैरहजेरीने सर्कसचा आत्माच हरविला; पण श्रोत्यांना आपल्या विदुषकी करामतींनी हसविणारे विदुषक, एकाहून एक सरस कवायती, कसरतीचे खेळ दाखविणारे कलावंत आजच्या काळातही सर्कसचे अस्तित्व कायम राखत आहेत़४५ वर्षाचं वय आणि उंची अडीच फुट; पण तंबूत उपस्थितांना आपल्या नावीन्यपूर्ण विनोदाने हसायला लावणारा गुड्ड्या ऊर्फ रमेश बर्मन हा पश्चिम बंगाल येथील कुचबिहार जिल्ह्याचा विनोदवीर येथील न्यू कमल सर्कसचे आकर्षण ठरला आहे. १५ बाल व १० युवा कलावंताचा ताफा घेऊन २० वर्षांनी प्रथमच ही सर्कस शहरात डेरेदाखल झाली. जेमिनी-जम्बो, ग्रेट बॉम्बे, राजकमल, एरिना या देशविख्यात सर्कसमध्ये ३० वर्षांपासून विदुषकाचे काम करणाऱ्या रमेश बर्मनने आपल्या कामाची सुरुवात वयाच्या दहाव्या वर्षी बंगालमध्येच प्लाझा सर्कसपासून केली. स्वातंत्र्यानंतर कार्लेकर, कमल, एरिना-ग्रेट ओरिएन्टल आशिया, जम्बो सारख्या किमान १५० हून अधिक सर्कस शौकिनांच्या सेवेत होत्या; पण हत्ती, घोडे, सिंह, वाघ या प्राण्यांच्या सर्कसमधील खेळांवर बंदी आल्याने आता देशात किमान ५०-६० सर्कस अस्तित्व टिकवून आहे. सर्कसमधील तीन तासांच्या खेळापैकी एक-दीड तास प्राण्यांचे खेळ असायचे़ यामुळे बालकांसह आबालवृद्धांचे मनोरंजन होत असे; पण आता श्रोते यापासून वंचित झाल्याची खंत गुड्ड्याने व्यक्त केली. सहा हजार या कमी मानधनावर सर्कसचे अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही विनोद करून रसिकांना हसवितो; पण भविष्यात प्राण्यांच्या खेळावरील बंदी न हटल्यास सर्कसचे अस्तित्व धोक्यात येऊन कलावंतांच्या जीवनात उदासिनता येऊ शकते, अशी वेदनाही रमेश बर्मनने व्यक्त केली. सर्कसचे शो आता तीनऐवजी दोन तासावर आल्याचे व्यवस्थापक मुकीन खान, उदय नायर यांनी सांगितले.