शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

येळाकेळी गटात इच्छुकांची मोर्चेबांधणी

By admin | Updated: January 25, 2017 01:05 IST

जि.प. व पं.स. च्या निवडणुकीचा बिगुल वाजताच इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

अरविंद काकडे   आकोली जि.प. व पं.स. च्या निवडणुकीचा बिगुल वाजताच इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. उच्छुकांकडून नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहे. यासह गावातील पुढाऱ्यांच्या भेटी घेऊन चाचपणी केली जात आहे. येळीकेळी गट हा नामाप्र महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. तरी आपल्या सौभाग्यवतीला उमेदवारी मिळावी म्हणून त्यांची धडपड सुरू आहे. येळीकेळी गण खुल्या प्रवर्गासाठी असल्याने तेथे इच्छुकांच्या आशेला पंख फुटले आहे. तर आमगाव (म.) गण महिलांसाठी राखीव आहे. भाजपाकडून सोनाली अशोक कलोडे व मंजुषा संजय दुधबडे यांनी उमेदवारी मागितली. गटातटाच्या राजकारणात सेलू पं.स. च्या विद्यमान सभापती मंजुषा दुधबडे यांचे नाव मागे पडले. अशोक कलोडे यांच्या सौभाग्यवतीचे तिकीट पक्के समजले जात आहे. कॉँग्रेसकडून मनीषा रवी वैरागडे यांचे नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादीकडून दिप्ती राजेंद्र नाखले व वैशाली ओमप्रकाश ढवळे यांनी उमेदवारी मागितली आहे. येळीकेळी गणाकरिता भाजपाच्या मंजुषा दुधबडे, राष्ट्रवादीकडून श्याम वानखेडे, हरीभाऊ झाडे, राजू उडाण तर कॉँग्रेसकडून राजश्री राजेश झाडे, अविनाश वानखेडे यांची नावे चर्चेत आहे. आमगाव (म.) गणात भाजप कडून प्रणाली अरूण गौळकर, शितल अभय ढोकणे, बेबी मारोती भांडेकर, खिराळे तर राष्ट्रवादीकडून सीमा संजय काकडे, सुवर्णा हरीभाऊ येलोरे यांची नावे चर्चेत आहे. नामांकन दाखल करण्याचा अवधी जसा येत आहे तसा निवडणुकीचा ज्वर चढत आहे. यातही कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस मध्ये आघाडी होणार असल्याने इच्छुकांच्या हृदयाचा ठोका चुकला आहे. यात कोणत्या पक्षाला कुठली उमेदवारी वाट्याला येईल हे वेळच ठरवेल!