शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

यंदाची दिवाळी पुरणपोळीविनाच

By admin | Updated: October 28, 2016 01:34 IST

दिवाळीच्या सणात गोड म्हणताच हातावर आणून पानावर खाणाऱ्यांना पुरणाशिवाय पर्याय नसतो.

पुरवठाच नाही : स्वस्त धान्य दुकानातून चणाडाळ बेपत्ता रूपेश खैरी वर्धा दिवाळीच्या सणात गोड म्हणताच हातावर आणून पानावर खाणाऱ्यांना पुरणाशिवाय पर्याय नसतो. त्यांची दिवाळी गोड करणारा पदार्थ म्हणून पुरणाची विशेष ओळख आहे; मात्र जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानात गत दोन महिन्यांपासून चण्याची डाळ बेपत्ता असल्याने यंदाच्या दिवाळीत त्यांच्या घरी पुरण शिजणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दिवाळसण तोंडावर येताच महागाईचा भडका उडणे नवे नाही. यात गत महिन्यांपासूनच चण्याच्या डाळीच्या दराने चांगलीच भरारी घेतली आहे. आज चण्याची डाळ बाजारात सरासरी १४० रुपये किलोंवर आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांकरिता ती विकत आणणे सध्यातरी अवघड झाले आहे. मध्यंतरी शासनाच्यावतीने सर्वांनाच चण्याची डाळ ७५ रुपये किलोच्या दराने देण्याची घोषणा केली होती; मात्र जिल्ह्यात गत दोन महिन्यांपासून चण्याच्या डाळीचे आवंटनच आले नसल्याने स्वस्त धान्य दुकानातून डाळ बेपत्ता झाली आहे. दिवाळीच्या सणात चण्याच्या डाळीपासून तयार करण्यात आलेल्या चकली, शेव आदी पदार्थांची विशेष मागणी असते. या काळात गरीबांना स्वस्त धान्याच्या दुकानातून चण्याची डाळ मिळण्याची अपेक्षा होती. मात्र जिल्ह्यातील दुकानातून ही डाळ बेपत्ता असल्याने यंदाच्या दिवाळीत नेहमीच्या तुलनेत अधिक महाग असल्याने डाळ कशी व कुठून आणावी या चिंतेने अनेकांच्या चेहऱ्याचा रंग उडविला आहे. या काळात निदान शासनाने केलेली घोषणा पूर्ण करावी अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे. तुरीची डाळही बेपत्ता साठेबाजांमुळे काही दिवसांपूर्वी तुरीच्या डाळीने झळाळी घेतली होती. मात्र शासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत तुरीची डाळ मिळणे सोपे झाले. शासनाने कारवाई करीत मोठ्या प्रमाणात तुरीचा साठा ताब्यात ठेवला आहे. असे असले तरी स्वस्त धान्य दुकानात अद्याप तुरीची डाळ आली नाही. परिणामी नागरिकांना चण्याच्या डाळीसह तुरीच्या डाळीकरिताही भटकंती करावी लागत असल्याचे वास्तव जिल्ह्यात आहे. चण्याचे दरही कडाडलेलेच शेतकऱ्यांच्या घरातील चणा संपल्यानंतर आज बाजारात चण्याला कधी नव्हे तेवढा १० हजार रुपयांचा दर मिळाला आहे. यामुळे बाजारात असलेले डाळीचे दर कोसळण्याची शक्यता नाही. परिणामी नागरिकांना आणखी काही दिवस चण्याच्या डाळीचे चढलेले दर कायम राहणार असल्याचे संकेत आहेत. जिल्ह्यात ५५ हजार शिधापत्रिकाधारक जिल्ह्यात अन्न पुरवठा विभागाकडे एकूण ५५ हजार शिधापत्रिकाधारक आहेत. या शिधापत्रिकाधारकांकडून स्वस्त धान्य दुकानातून धान्याची उचल केली जाते. त्यांना या दुकानातून साखर, गहू व तांदूळ मिळत आहे. मात्र या काळात साऱ्यांना हवी असलेली चण्याची डाळ दुकानातून बेपत्ता असल्याचे दिसताच त्यांचा हिरमोड होत आहे. स्वस्त धान्य दुकानातून एका शिधापत्रिकेवर एक किलो डाळ देण्याचा निर्णय असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र याच एक किलो डाळीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.