शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

यंदा जिल्ह्यात तुरीच्या उत्पादनात येणार हेक्टरी नऊ क्विंटलची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 05:00 IST

जिल्ह्यात काही शेतकरी सलग तूर तर काही आंतरपीक म्हणून तूर  लागवड करतात. यंदा जिल्ह्यात ६६,३८४.६९ हेक्टरवर तूर पिकाची लागवड झाली. दिवाळीपूर्वी पीक परिस्थिती बघता हेक्टरी सरासरी १३.३५ क्विंटल उत्पादनाची शक्यता होती. पण दिवाळीनंतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहिल्याने तसेच तूर पिकावर फ्युजारियम उमड आणि फायटोप्थोरा करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने तूर उत्पादकांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदा वेळोवेळी झालेल्या पावसामुळे तूर पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. परंतु मध्यंतरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिल्याने फ्युजारियम उमड आणि फायटोप्थोरा करपा या रोगाने तूर पिकावर अटॅक केल्याने तूर पीक करपत आहे. परिणामी, यंदा तुरीच्या उत्पादनात हेक्टरी नऊ क्विंटलने घट येण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात काही शेतकरी सलग तूर तर काही आंतरपीक म्हणून तूर  लागवड करतात. यंदा जिल्ह्यात ६६,३८४.६९ हेक्टरवर तूर पिकाची लागवड झाली. दिवाळीपूर्वी पीक परिस्थिती बघता हेक्टरी सरासरी १३.३५ क्विंटल उत्पादनाची शक्यता होती. पण दिवाळीनंतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहिल्याने तसेच तूर पिकावर फ्युजारियम उमड आणि फायटोप्थोरा करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने तूर उत्पादकांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी हिरवेगार दिसणारे तूर पीक अचानक करपायला सुरूवात झाल्याने यंदा तुरीच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे. फ्युजारियम उमड आणि फायटोप्थोरा करपाचा प्रादुर्भाव मध्यंतरी जिल्ह्यावर ओढावलेल्या थंडीच्या अटॅकमुळे जिल्ह्यात यंदा तुरीचे उत्पादन हेक्टरी ४ ते ५ क्विंटल होणार आहे.

फ्युजारियम उमड- फ्युजारियम उमड म्हणजेच मर हा रोग जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो. पानाच्या शिरा पिवळ्या होतात. शिवाय पाने पिवळी पडतात. झाडाचे शेंडे मलूल होतात आणि कोमेजतात. झाड हिरव्या स्थितीत वाळते. जमिनीलगतच्या खोडाचा भाग काळ्या रंगाचा बनतो. मूळ उभे चिरले असता मुळांचा मध्य भाग काळा दिसतो. यात बुरशीची वाढ झालेली दिसते. कधीकधी खोडावर पांढरी बुरशीही आढळते.

फायटोप्थोरा करपा-    हा रोग फायटोप्थोरा ड्रेसलेरा या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे पानावर ओलसर चट्टे तसेच खोडावर तपकिरी वा गर्द तपकिरी चट्टे जमिनीलगत किंवा जमिनीपासून काही इंच अंतरावर आढळतात. नंतर हे चट्टे वाढत जाऊन खोडाभोवती खोलगट भाग तयार होतो. तसेच काही वेळा खोडावर गाठी तयार होतात. पाण्यातून व हवेद्वारे या रोगाच्या बिजाणूचा प्रसार होतो.

देवळी तालुक्याला सर्वाधिक फटका -    फ्युजारीयम उमड अन् फायटोप्थोरा करपा रोगाचा सर्वाधिक प्रादुर्भाव देवळी तालुक्यातील उभ्या तूर पिकावर झाला आहे. देवळी तालुक्यात यंदा ८ हजार ६८८ हेक्टरवर तूर पिकाची लागवड झाली असून, त्यापैकी तब्बल ३ हजार ४७५ हेक्टरवरील उभ्या तूर पिकाचे फ्युजारीयम उमड अन् फायटोप्थोरा करपा रोगामुळे नुकसान झाले आहे.

फ्युजारियम उमड व फायटोप्थोरा करपा या रोगामुळे जिल्ह्यातील ६६ हजार ३८४.६९ हेक्टर पैकी २७ हजार ४२३ हेक्टरवरील तूर पिकाचे नुकसान झाले आहे. दिवाळीपूर्वी जिल्ह्यात हेक्टरी १३.३५ क्विंटल तूर उत्पादनाची शक्यता होती. पण आता हेक्टरी ४ ते ५ क्विंटल उत्पादनाची शक्यता आहे.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

तूरडाळीच्या भावात येणार तेजीतूर पिकावर फ्युजारीयम उमड अन् फायटोप्थोरा करपा रोगाचा प्रादुर्भाव वर्धा जिल्ह्यासह नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर याही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने यंदा तुरीच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे. उत्पादन कमी आणि मागणी जास्त या कारणामुळे यंदा तूरडाळीच्या भावात चांगलीच तेजी राहणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :agricultureशेती