शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा होळी सणावर कोरोनाने फेरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST

होळीच्या उत्सवात वाबरले जाणारे रंग चीनमधून येतात. असे रंग वापरू नका अशा स्वरूपाचे मेसेज व्हायरल होत आहेत. वसंत ऋतूमधील फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. दरवर्षी बाजारपेठेत या सणानिमित्त सर्वत्र उत्साह संचारला असतो. यावेळी मात्र, कोरोनाच्या भीतीने बाजारपेठेतही शुकशुकाट आहे. उत्तर भारतात हा सण मोठ्या उत्साहात रंगांची उधळण करूत साजरा केला जातो.

ठळक मुद्देसंडे अँकर । बाजारपेठेत निरूत्साह, नागरिकांतही संभ्रम कायम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : होळी सणावरही यंदा कोरोनाची गडद छाया आहे. या उत्सवात वापरले जाणारे रंग चीनमधून येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाने जगभर हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. भारतातही काही रुग्ण आढळून आले आहेत. सोशल मीडियात याविषयी मेसेज व्हायरत होत आहेत. जिल्ह्यात अद्याप एकही संशयित रुग्ण आढळून आला नाही. असे असले तरी बाजारपेठेवरही कोरोनाचा परिणाम दिसून येत आहे.होळीच्या उत्सवात वाबरले जाणारे रंग चीनमधून येतात. असे रंग वापरू नका अशा स्वरूपाचे मेसेज व्हायरल होत आहेत.वसंत ऋतूमधील फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. दरवर्षी बाजारपेठेत या सणानिमित्त सर्वत्र उत्साह संचारला असतो. यावेळी मात्र, कोरोनाच्या भीतीने बाजारपेठेतही शुकशुकाट आहे. उत्तर भारतात हा सण मोठ्या उत्साहात रंगांची उधळण करूत साजरा केला जातो. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगण्यात येते. संसर्गातून पसरणाऱ्या या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वत:ची काळजी घेणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, स्पर्श टाळणे, मास्कचा वापर करणे यासारख्या उपाययोजना जिल्हा प्रशासनाने सुचविल्या आहेत. चीनमधून रंग आणि इतर साहित्य येत असल्याने ते खरेदी करायचे की नाही, या संभ्रमात वर्धेकर नागरिक दिसून येत आहेत.वर्ध्याच्या बाजारपेठेत नागपूर येथून रंग आणि इतर साहित्य विक्रेते विक्रीस आणतात. अवघ्या दोन-तीन दिवसांवर होळी सण येऊन ठेपला असताना बाजारपेठेत निरुत्साहाचे वातावरण आहे. विक्रेत्यांना ग्राहकांची अक्षरश: प्रतीक्षा करावी लागत आहे.मास्क खरेदी वाढलीजिल्ह्यात कोरोना संशयित रुग्ण अद्याप आळून आलेला नाही. तरीदेखील वर्धेकर नागरिकांत कमालीची भीती आहे. मेडिकल स्टोअर्समधून नागरिक मास्क खरेदी करीत असल्याचे चित्र आहे. पोल्ट्री फार्म या व्यवसायावरही कोरोनाची गड छाया असून जिल्ह्यातील अनेक व्यवसाय बंद पडल्याची वस्तुस्थिती आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाHoliहोळी