शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ५१५ बालके कुपोषित

By admin | Updated: January 23, 2016 02:06 IST

कुपोषणमुक्तीकरिता शासनाकडून आरोग्य विभाग, अंगणवाड्या तसेच अन्य विभागांमार्फत प्रयत्न होत आहे.

एनआरसी केंद्राची स्थापना : पोषण आहाराच्या योजनांनंतरही लक्ष्य असाध्यचप्रशांत हेलोंडे वर्धाकुपोषणमुक्तीकरिता शासनाकडून आरोग्य विभाग, अंगणवाड्या तसेच अन्य विभागांमार्फत प्रयत्न होत आहे. विविध पोषण आहाराच्या योजना राबविल्या जात आहेत; पण कुपोषणातून मुक्ती मिळताना दिसत नाही. जिल्ह्यात यावर्षीही ५१५ कुपोषित बालकांची नोंद झाली आहे. या बालकांकरिता आता पुनर्वसन केंद्र (एनआरसी) स्थापन करण्यात आले आहे. यातून कुपोषित बालक व त्यांच्या मातांना सेवा पुरविली जाणार आहे.कुपोषणातून मुक्ती मिळविण्याकरिता केंद्र व राज्य शासनाकडून विविध प्रयोग केले जात आहेत. आरोग्य यंत्रणेसह अंगणवाड्यांतून कुपोषित बालके व त्यांच्या मातांचे संगोपन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कुपोषित बालकांना अंगणवाड्यांतून वेगळ्या प्रकारचा पोषण आहार पुरविला जातो. शिवाय त्यांच्या मातांनाही आहार व उपचार दिले जातात. या संपूर्ण सुविधा मोफत पुरविल्या जातात. आरोग्य यंत्रणेच्या पथकाकडून अंगणवाडी केंद्रात जाऊन कुपोषित बालकांची तपासणी केली जाते. तालुकास्तरावर कुपोषित बालकांच्या सुश्रूषेकरिता व्हीसीडीसी केंद्र आहे. या बाल उपचार केंद्रात सौम्य व मध्यम गटातील कुपोषित बालक व मातेला तपासणी करीत पोषण आहार दिला जातो.यानंतर तीव्र गटातील बालकांकरिता जिल्हास्तरावर जिल्हा सामान्य रुग्णालयात एनआरसी केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. यात कुपोषित बालक व त्यांच्या मातांना १४ दिवस भरती करून घेतले जाते. या १४ दिवसांची मजुरी सदर मातेला मिळते. शिवाय बालक व मातेची दररोज तपासणी होते. त्यांना पोषण आहार दिला जातो. तज्ञांकडून बालकाचे दररोज वजन व उंची मोजली जाते. १४ दिवसांत बालकाचे वजन १५ टक्केपेक्षा अधिक वाढले तर मग त्यांना सुटी दिली जाते. वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातही एनआरसी केंद्र स्थापन करण्यात आले. या केंद्रांतर्गत कुपोषण दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात कुपोषणातून पूर्णत: मुक्ती मिळाली नसली तरी त्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यात सॅम (तीव्र) प्रकारात १०७ तर मॅम (मध्यम) गटातील ४०८ बालके कुपोषित असल्याचे समोर आले आहे. यातही सर्वाधिक ११२ कुपोषित बालकांची नोंद कारंजा तालुक्यात झाल्याचेही आरोग्य यंत्रणेद्वारे कळविण्यात आले आहे.आता प्रत्येक जिल्हा रुग्णालयात पुनर्वसन केंद्रराज्य शासनाने कूपोषणमुक्तीकरिता एनआरसी केंद्राची स्थापना केली आहे. प्रारंभी राज्यातील केवळ आठ जिल्हा रुग्णालयांमध्ये या केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. या केंद्रातून प्रायोगिक तत्वावर कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात बऱ्यापैकी यश आल्याने आता प्रत्येक जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयामध्ये एनआरसी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील तीव्र कुपोषित बालकांना पोषण आहार देणे व त्यांच्यावर उपचार करणे सोईचे झाले आहे.