शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळचा श्रीकांत टकले ठरला ‘स्वरांजली’चा विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:22 IST

विद्या विकास कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समुद्रपूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने प्रा. अभय बावणे यांच्या स्मृतीत आयोजित ‘स्वरांजली’ या १९ व्या विदर्भस्तरीय गीतगायन स्पर्धेत यवतमाळचा श्रीकांत टकले प्रथम पुरस्काराचा मनकरी ठरला.

ठळक मुद्देगीतगायन स्पर्धा : विदर्भातील ५६ गायकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : विद्या विकास कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समुद्रपूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने प्रा. अभय बावणे यांच्या स्मृतीत आयोजित ‘स्वरांजली’ या १९ व्या विदर्भस्तरीय गीतगायन स्पर्धेत यवतमाळचा श्रीकांत टकले प्रथम पुरस्काराचा मनकरी ठरला. तर ब्रह्मपुरीची प्रणाली पाटील व नागपूरची श्रीया मेंढी अनुक्रमे द्वितीय व तृतीय बक्षीसचे मानकरी ठरले.समारोपीय कार्यक्रमात त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत विदर्भातील ५६ गायक सहभागी झाले होते. अंतिम फेरीकरिता १४ स्पर्धकांची निवड करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव पांडूरंग तुळसकर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष शीला सोनारे, डॉ. केशव वाळके, प्राचार्य रमेश बोभाटे, शांतीलाल गांधी, डॉ. निलेश तुळसकर, श्याम अलोणी, सुधीर खडसे, भरत सामतानी, प्रकाश भोले, प्रा. किरण वैद्य, प्रा. विलास बैलमारे, गणेश महाकाळकर यांची उपस्थिती होती. प्रथम विजेता श्रीकांत टकले याला स्व. डॉ. सुधीर खेडूलकर यांच्या स्मृतीत पुरस्कार देण्यात आला. किशोर दिघे यांनी त्याला सन्मानित केले. तर प्रणाली पाटील हिला धनराज गोल्हर यांनी तर श्रेया मेंढी यांना प्रकाश भोळे यांनी सन्मानित केले. शिवाय चतुर्थ पुरस्कार मुकेश मेहरा चंद्रपूर याला आशीष पर्बत यांच्याकडून तर पाचवा पुरस्कार ओम गणेश महाकाळकर यांच्या कडून तिघांना देण्यात आला. यावेळी दहा स्पर्धकांना प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात आले. बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आ. समीर कुणावार तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. उमेश तुळसकर, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, डॉ. राजविलास कारमोरे, गजानन देशमुख, धनराज गोल्हर, दादा देशकरी, चंद्रकांत माळवे आदींची उपस्थिती होती. परिक्षक म्हणून सुनील वाघमारे, जयंत भिरंगे, प्रा. सालबर्डे व अरूण सुरजुसे यांनी काम पाहिले.