शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील वायगाव हळद ओमानला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 12:15 IST

वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथील हळद साता समुद्रापार ओमान देशात जाणार आहे. याबाबतचा निर्यात करार १५ आॅगस्ट रोजी ओमान सरकारच्या प्रतिनिधीसोबत अधिकारी व लोकप्रतिनिधी करणार आहेत.

ठळक मुद्देस्वातंत्र्यदिनी करार ओमान सरकारसोबत लोकप्रतिनिधींची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथील हळद साता समुद्रापार ओमान देशात जाणार आहे. याबाबतचा निर्यात करार १५ आॅगस्ट रोजी ओमान सरकारच्या प्रतिनिधीसोबत जिल्ह्यातील अधिकारी व लोकप्रतिनिधी करणार आहेत. वर्धा जिल्ह्यातील हळद उत्पादकांच्या दृष्टीने हा सोनेरी क्षण आहे.वायगाव हळदीला नुकतेच मानांकन प्राप्त झाले आहे. भौगोलिक उपदर्शन जिओग्राफिकल इंडिगेशन चेन्नईच्या सर्वेक्षणात वायगाव या हळदीमध्ये कर्क्यूमिन हा औषधी घटक सहा टक्के अधिक असल्याचे सिद्ध झाले आहे. अनेक पिढ्यांपासून येथील शेतकरी हळदीची लागवड करीत भरघोस पीक घेतात. भारतातच नव्हे तर जागतिक बाजारपेठेत येथील हळदीची ख्याती आहे.पाच वर्षांपूर्वी सेलम जातीच्या हळदीला पर्याय म्हणून वायगाव हळदीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्या शाखेच्या शास्त्रज्ञांनी संशोधन केले. यात इतर जातीच्या तुलनेत येथील हळदीमध्ये कर्क्यूमिनचे प्रमाण अधिक असल्याचे सिध्द झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या हळदीची मागणी वाढू लागली. त्यामुळे आता ओमान देशात ही हळद निर्यात केली जाणार आहे. वायगाव हळद उत्पादन कंपनी व एसडीएफ या ओमान देशातील कंपनीसोबत हळद निर्यात करार वर्धा येथे १५ आॅगस्ट रोजी इव्हेंट सभागृहात होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, खा. रामदास तडस, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, आ. समीर कुणावार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर आदी उपस्थित राहणार आहे. ओमान सरकारतर्फे मुख्यधिकारी एसाम अली नाजर व विनायक काशीद यांच्यासोबत हा करार होणार असल्याची माहिती वायगाव हळद उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधीने दिली.

टॅग्स :agricultureशेती