शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

चुकीची वायरिंग, उपकरणे जळाली

By admin | Updated: October 28, 2016 01:42 IST

स्व्थानिक वॉर्ड क्र. १४ व १५ मध्ये विद्युत पुरवठा करण्याकरिता नवीन रोहित्र बसविण्यात आले

दहा लाखांच्या नुकसानीचा अंदाज : नवीन रोहित्र ठरले तापदायकसमुद्रपूर : स्व्थानिक वॉर्ड क्र. १४ व १५ मध्ये विद्युत पुरवठा करण्याकरिता नवीन रोहित्र बसविण्यात आले; पण यात चुकीचे विद्युत प्रवाह करणारे वायर जोडण्यात आले. परिणामी, सदर वॉर्डातील टीव्ही, फॅन, फ्रीज, बल्ब जळाल्याने नागरिकांचे सुमारे १० लाख रुपयांवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे.वॉर्ड क्र. १४ व १५ मधील विद्युत पुरवठा करणारे ट्रान्सफार्मर बसविण्याकरिता वर्धा येथील रूद्रानी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. बुधवचारी ट्रान्सफार्मर बसवून ४ वाजताच्या सुमारास विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला. दरम्यान, अचानक नागरिकांचे टीव्ही, फॅन, फ्रीज, सी.एफ.एल. बल्ब, जलशुद्धीकरण यंत्र जळाल्याच्या तक्रारी यायला लागल्या. नागरिक ओरडत रस्त्यावर आले. कित्येकांना मोबाईल चार्जरमध्ये सुद्धा करंट आल्याचे जाणवले. माहिती प्राप्त होताच विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. नंतर पाहणी केली असता ट्रान्सफार्मरमध्ये चुकीचा विद्युत पुरवठा करण्यात आल्याचे लक्षात आले; पण तोपर्यंत १०० नागरिकांकडील उपकरणे जळाली होती. यात सुमारे १० लाख रुपयांवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे.घटनास्थळी उपकार्यकारी अभियंता वसंत हेडाऊ, सहा. अभियंता अमित वानखेडे दाखल झाले. त्यांनी ट्रान्सफार्मरची पाहणी करीत वायर सरळ करून विद्युत पुरवठा सुरळीत सुरू केला. यात नितीन बांगडे, ज्ञानदेव उराडे, दिनेश नरताम यांच्या घरातील अधिक साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले. अनिल जुमडे, राष्ट्रपाल कांबळे, माणिक चिखलकर, दशरथ चावरे, राजू मेंढे, जयंत मोटघरे, संजय वालझडे, रामभाऊ आकडे, भाऊ शेंडे, वासुदेव धंदाडे, नत्थू शेळके, सुनील बेतवार, रामचंद्र वीने, गजानन बाळसराफ, ढोणे, विशाल हांडे, काशीनाथ थुटे, राजू कौराते सह १०० च्यावर घरातील उपकरणे जळाली. याबाबत वरिष्ठांना तक्रार केली आहे.(तालुका प्रतिनिधी)