शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

लेखा कर्मचाऱ्यांचे सातव्या दिवशी लेखणीबंद आंदोलन सुरूच

By admin | Updated: March 22, 2017 00:58 IST

जिल्हा परिषदेतील लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या आवारात लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे.

खासदारांनी जाणून घेतल्या समस्या : पाठपुरावा करण्याचे दिले आश्वसन वर्धा : जिल्हा परिषदेतील लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या आवारात लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. सातव्या दिवशीही आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर योग्य तोडगा न निघाल्याने मंगळवारी सदर आंदोलन सुरू होते. मंगळवारी दुपारी खासदार रामदास तडस यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी मागण्यांचा निकाली निघाव्या यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सावत्रपणाची वागणूक दिल्या जात असल्याचा आरोप करीत विविध मागण्यांसाठी जि.प.तील लेखा कर्मचाऱ्यांनी सुरूवातीला काळी फित लावून निषेध आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान जि. प. लेखा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशीष दहिवडे यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी योग्य पावले न उचलल्यास लेखणीबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याअनुषंगाने १५ मार्च २०१७ पासून जि. प. च्या आवारात लेखा कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या मागण्यांवर योग्य तोडगा न निघाल्याने मंगळवारी सातव्या दिवशी सदर आंदोलन सुरूच होते. मंगळवारी दुपारी खा. रामदास तडस यांनी आंदोलनस्थळ गाठून आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. यावेळी खासदार तडस यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या व समस्या जाणून घेतल्या. त्यावर खासदारांनी जि.प.तील लेखा कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या निकाली निघण्यासाठी आपण शासनदरबारी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तसेच नगराध्यक्ष अतुल तराळे यांनीही लेखा कर्मचाऱ्यांच्या आंदोलन स्थळी जावून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मार्च महिन्यात प्रत्येक शासकीय कार्यालयात कामाचा व्याप वाढतो. जिल्हा परिषदेतही कामाचा व्याप जास्त असतो. या आंदोलनामुळे जि.प.तील कामे खोळंबली आहे.(शहर प्रतिनिधी)