शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दारूमुक्त भारतासाठी विश्वशांती पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:15 IST

महात्मा गांधींनी दारुमुक्त भारताचे स्वप्न पाहिले होते. त्यांचे ते स्वप्न साकार करण्यासोबतच त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवून विश्वात शांती निर्माण करण्यासाठी विश्वशांती पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा रविावारी सेवाग्राम आश्रमात नतमस्तक होऊन पुढील प्रवासाकरिता निघाली.

ठळक मुद्देसेवाग्राम आश्रमाला भेट : यात्रेकरूंचे सूतमालेने स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम: महात्मा गांधींनी दारुमुक्त भारताचे स्वप्न पाहिले होते. त्यांचे ते स्वप्न साकार करण्यासोबतच त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवून विश्वात शांती निर्माण करण्यासाठी विश्वशांती पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा रविावारी सेवाग्राम आश्रमात नतमस्तक होऊन पुढील प्रवासाकरिता निघाली.महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंती महोत्सवा निमित्ताने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी १२ जानेवारीला पुण्यातून या विश्वशांती पदयात्रेला सुुरुवात झाली. देशातील युवक-युवती ही देशाची ताकद असल्याने बापू व बा च्या जीवनकार्याचा संदेश देशाकरिता आवश्यक आहे. तो संदेश पोहचविण्याचे काम या यात्रेत सहभागी असलेले योगेश माथुरिया, आश्रमचे जालंधरनाथ, गणेश सूर्या, गिरीश कुलकर्णी व अ‍ॅड. शाम आसवा करीत आहे. रविवारी ही यात्रा आश्रमात पोहचल्यावर आश्रमच्या ज्येष्ठ गांधीवादी कुसूम पांडे, महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवचरण ठाकूर, सचिन हूड यांनी सुतमाळेने यात्रेकरुंचे स्वागत केले. बापू कुटीत सर्वधर्म प्रार्थना व भजन करण्यात आले. यावेळी जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गुजर, अभिमन्यू भारतीय, भाई रजनीकांत, संदेश राऊत, पंडित चन्नोळे, आकाश लोखंडे, दिनेश गणवीर, रामसिंह बघेल, रुपेश कडू, अशोक वहिवटकर, इस्लाम हुसैन, प्रभा शहाने, सोनू उंबरकर, सुचित्रा झाडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी जालंधरनाथ म्हणाले की, नुकतीच द. आफ्रिकेत पदयात्रा करुन आलो. त्याचाच एक भाग म्हणून पुणे ते बांग्लादेश व जपान अशी यात्रा करीत आहे.गांधी १५० हे औचित्य असले तरी त्यांच्या विचायाची गरज आहे. अकरा वर्षापासून पदयात्रेच्या माध्यमातून बापू व बा यांचा संदेश पोहचविण्याचे कार्य करीत आहे. बापूंनी मेरा जीवन ही संदेश है, असे म्हटले. त्यानुसार ‘मेरे हाथ ही मेरा संदेश है’. आता हातावरील संदेश माझे जीवन बनले आहे, असेही ते म्हणाले. ही यात्रा आता सेवाग्राम, तरोडा, भिवापूर, रायपूर, छत्तीसगड, ओडिसा, बंगाल, बांगलादेश, जपान अशा सतरा देशात फिरणार असून २१ सप्टेंबर २०२० ला विश्वशांती दिवसाला जिनेव्हा येथे यात्रेचा समारोप होणार आहे. आतापर्यंत ८१३ कि.मी.चा प्रवास केल्याचे यात्रेकरु योगेश माथुरिया यांनी सांगितले. 

टॅग्स :Sewagramसेवाग्राम