शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या ये-जा करण्यामुळे कार्यालयीन कामांचा खेळखंडोबा

By admin | Updated: November 7, 2016 00:50 IST

विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने कार्यालयीन कामांचा खोळंबा होतो

मुख्यालयी राहण्याचा नियम शासकीय कर्मचाऱ्यांकडून पायदळी पुलगाव : विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने कार्यालयीन कामांचा खोळंबा होतो. याकरिता शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचा नियम तयार केला. मात्र जिल्ह्यातील विविध कार्यालयातील कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे चित्र आहे.नियमाकडे दुर्लक्ष होत असल्याने ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसते. रेल्वेस्थानक, बसस्थानक येथे सकाळी ९ ते १० च्या सुमारास प्रवासी कर्मचाऱ्यांची गर्दी पाहिली तरी अंदाज येतो. घटनादुरुस्तीमुळे प्रशासकीय यंत्रणेला बळकटी येईल, अशी वल्गना केली जात असताना ग्रामविकास अधिकारी, महसूल यंत्रणेतील तलाठी, जिल्हा परिषदेचे शिक्षक, वनविभाग, जलसंधारण, पाटबंधारे, जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा पुरवठा विभाग, समाजकल्याण विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय, हिवताप विभाग, खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील अशा विविध सरकारी, निमसरकारी विभागातील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी न राहता बाहेर गावावरुन नित्याने ये-जा करताना दिसतात. त्यामुळे कामाची वेळ ही अर्ध्यावरच येते. कार्यालयीन वेळ प्रवासात जात असल्याने कामाचा खेळखंडोबा होतो. कामानिमित्त तालुकास्थळी आलेल्या नागरिकांना अडचणींना सामना करावा लागतो. शासनाच्या अधिनियमाद्वारे कर्मचाऱ्यांना सेवा, शिस्त, वर्तणूक अशा कर्तव्याचा मापदंड घालून दिला असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून त्याला छेद दिला जात आहे. कित्येक जण मुख्यालयी राहत नसताना घरभाडे भत्ता घेत असल्याची माहिती आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करुन कारवाई केल्यास याला चाप बसेल. तसेच सर्वसामान्यांची कामे त्वरीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)