शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रकल्पावर आज कार्यशाळा

By admin | Updated: March 10, 2017 00:52 IST

निसर्गात पक्ष्यांचे स्थान अतिशय महत्त्वाचे असून या पक्ष्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे.

पक्षी निरीक्षणावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन वर्धा : निसर्गात पक्ष्यांचे स्थान अतिशय महत्त्वाचे असून या पक्ष्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. या संदर्भात पक्षीमित्रांना माहिती देण्याकरिता वर्धेतील इआरसीएस व रामकृष्ण बजाज कृषी विद्यालय, पिपरी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शुक्रवारी सकाळी १० वाजता रामकृष्ण बजाज कृषी विद्यालयात कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत बाहेर जिल्ह्यातील ३० पक्षीमित्र सहभागी होऊ शकणार असून जो पहिले येईल त्याचा प्रवेश निश्चित होईल, असे आयोजकांनी कळविले आहे. सदर प्रकल्प वर्धेत एन्व्हार्मेंटल रिसर्च अँड कन्झर्वेशन सोसायटी, इंडिया (ईआरसीएस) राबवत असून हा प्रकल्प राबविताना पक्ष्यांच्या वैज्ञानिक पद्धतीने नोंदी कशा घ्याव्यात व सामान्य पक्षी कसे व का अभ्यासावे याची माहिती या कार्यशाळेत देण्यात येत आहे. सदर कार्यशाळेत बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे नंदकिशोर दुधे मार्गदर्शक म्हणून राहणार आहेत. या कार्यशाळेस डॉ. बाबाजी घेवडे, ईआरसीएसचे संजय इंगळे तिगावकर, शिक्षा मंडळाचे अतुल शर्मा व रामकृष्ण बजाज कृषी विद्यालयाचे प्राचार्य डी. के. सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यशाळेकरिता ईआरसीएसचे वैभव देशमुख, जयंत सबाने, पराग दांडगे परीश्रम घेत आहेत. आधुनिक होणे म्हणजे निसर्गाशी दुरावा घेणे नव्हे. आधुनिकीकरणासह आपण निसर्गाशी जवळीक साधायला हवी. स्थानिक जैविक संपत्तीचे जतन व संवर्धन हे परिसरात राहणारे लोकच जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतात. स्थानिक जैवविविधतेच्या नोंदीही स्थानिक लोक जास्त प्रभावीपणे घेऊ शकतात, याच वास्तविकतेला जाणून बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीने कॉमन बर्ड मॉनीटरिंग हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय धेतला आहे. या प्रकल्पात सहभागी होणाऱ्या त्या-त्या भागातील लोकांना पक्षी अभ्यासण्याच्या वैज्ञानिक पद्धती शिकवण्यासाठी पुढकारही घेतला आहे.(प्रतिनिधी)