शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून दगडी बांध अन् शोषखड्डे

By admin | Updated: April 18, 2017 01:16 IST

जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धा सुरू होताच श्रमदानाने काय होऊ शकते याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत.

विरुळात जलक्रांतीचे तुफान : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धाविरूळ (आकाजी) : जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धा सुरू होताच श्रमदानाने काय होऊ शकते याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. विरूळ येथे श्रमदानातून दगडी बांध, दीडशे शोषखड्डे, वृक्षारोपणाकरिता एक हजार खड्डे नागरिकांनी स्वत: तयार केले. समतल चर आणि तलाव खोलीकरण, विहीर पुनर्भरणाचे कामही जोरात सुरू आहे. या कामाकरिता नागरिक सकाळी आणि सायंकाळी उत्साहाने श्रमदान करीत आहेत. यातून गावात तीन नव्या तलावांची निर्मिती करण्यात येत आहे. जलयुक्त शिवाराकरिता शेतकऱ्यांच्या भेटी व गावकऱ्यांच्या गृहभेटी आणि मुख्य चौकात पाणी बचत आणि त्याचा काटकसरीने वापर करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. पाणी वापरातून टंचाईवर मात करण्यासाठी करावयाच्या योजनांची चित्रफित दाखवित जानजागृती होत आहे. पावसाच्या पाण्याचा थेब न थेंब गावतच जिरवून गाव पाणी टंचाईमुक्त व शिवार जलयुक्त करण्यासाठी गावकरी सरसावले आहे. यासाठी सरपंच, सदस्य व ग्रामविकास अधिकारी कार्यरत आहे. तहसीलदार पवार यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.(वार्ताहर) वॉटर कपसाठी हजारो हात लागले कामाला...आर्वी तालुव्यात विरूळ (आकाजी) या गावाची वॉटर कपकरिता निवड झाली. आता आपण आघाडी घ्यायची, असे म्हणून गावकऱ्यांनी आपसी मतदभेत विसरून पाण्याची पातळी वाढविण्याचा संकल्प केला. पाण्याच्या बचतीकरिता व त्याच्या साठवणुकीकरिता मोठ्यांपासून चिमुकलेही सकाळी सहा वाजता उठून तलाव व नाल्याच्या खोलीकरणाच्या कामाला येत असल्याचे दिसते. पांजरा येथे काम सुरू रोहणा : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २ मध्ये पांजरा (बोथली) या गावाची निवड झाली आहे. येथे श्रमदानाने कामाला प्रारंभ झाला आहे. शोषखड्डे, वनीकरणाचे खड्डे, दगडी बांधाचे काम सुरू झाले आहे. पाण्याचे महत्त्व व काळाची गरज लोकांना समजावी म्हणून लोकप्रबोधनाचे कार्यक्रमदेखील गावात सुरू आहेत. श्रमदानात प्रदीप डोळे, कलावती खंडाते, चंद्रकला श्यामकोल, ईश्वर कासार, ग्रामसेवक शेळके, स्वयंसेवक दिवाकर आसटकर यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच तथा समस्त गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात. या कामात भगिनींचा सहभाग उल्लेखनीय असून सदर स्पर्धा गावातील भूजल पातळी वाढविण्यासाठी नक्कीच सहायभूत ठरेल असे चित्र आहे.(वार्ताहर)