शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात श्रमदानाचे तुफान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:42 IST

जिल्ह्यात वॉटरकप स्पर्धा सुरू होताच श्रमदानाचे तुफान आल्याचे दिसत आहे. वर्धेत खुद्द जिल्हाधिकाऱ्यांसह वर्धा शहरातील विविध सामाजिक संघटनाही या कामांत सहभागी होत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देबोदड येथे जिल्हाधिकाऱ्यांचे श्रमदान : वर्धा शहरातून ५०० युवकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात वॉटरकप स्पर्धा सुरू होताच श्रमदानाचे तुफान आल्याचे दिसत आहे. वर्धेत खुद्द जिल्हाधिकाऱ्यांसह वर्धा शहरातील विविध सामाजिक संघटनाही या कामांत सहभागी होत असल्याचे दिसत आहे. रविवारी वर्धा शहरातून विविध गावांत होणाऱ्या महाश्रमदानात सहभागी होण्याकरिता वर्धेतून तब्बल ५०० युवक सहभागी झाले होते.स्पर्धा असलेल्या गावांत या युवकांना पोहोचविण्याकरिता वर्धेतून दोन बसगाड्या रवाना झाल्या होत्या. एक बसगाडी बॅचलर मार्गावरील डॉ. सचिन पावडे यांच्या घरापासून तर दुसरी बसगाडी आर्वी मार्गावरील हनुमान मंदिराजवळून रवाना होत आहे. यात वैद्यकीय जनजागृती मंचाचे पदाधिकारी आणि त्यांच्या आवाहनातून अनेक युवक सहभागी होत आहे. या युवकांकडून नियोजित गावांत जात श्रमदान करीत आहे.आज बोदड, टेंभरी, परसोडी, बोरी (कोकाटे), सोेडी-हेटी येथे श्रमदान झाले. या श्रमदानात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सहभाग घेतला. त्यांनी आर्वी तालुक्यातील बोदड (पोड) येथे दगडी बांध निर्माण केला. येथे त्यांनी स्वत: दगड उचलून बांध बांधण्यास मदत केली. खुद्द जिल्हाधिकारी श्रमदान करीत असल्याचे पाहून गावातील नागरिकांनाही हुरूप येत आहे. यामुळे जिल्ह्यात ही स्पर्धा चांगलीच रंगत असल्याचे दिसत आहे. केवळ स्पर्धेत यशस्वी होण्याची वर्धेतील नागरिकांची इच्छा नसून गावांत संभाव्य पाणीटंचाईवर मात व्हावी याकरिता गावकरी काम करीत असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात होत असलेल्या श्रमदानातून पाण्याची समस्या दूर होण्याची शक्यता आहे.व्हीजेएमकडून गावकºयांना टोपले, फावडेया स्पर्धेकरिता महाश्रमदान साहित्याची कमतरता जाणवू नये म्हणून वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने गावकºयांना टोपले, फावडे भेट देत आहे. या साहित्याचा लाभ गावकºयांना होत आहे.