शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांनी संघटितपणे संघर्ष करण्याची गरज

By admin | Updated: July 8, 2015 02:22 IST

शहरातही बांधकाम कामगारांकडून कष्टाचे, मेहनतीचे काम करून कामाप्रमाणे मजुरी मिळत नाही.

विजय जावंधिया : इमारत बांधकाम संघटनेच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रम वर्धा : शहरातही बांधकाम कामगारांकडून कष्टाचे, मेहनतीचे काम करून कामाप्रमाणे मजुरी मिळत नाही. महागाई पाहता प्रत्येकाला ८०० रुपये रोज मिळणे गरजेचे आहे. सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी दरमहा २० हजार वेतन घेतो. तेवढेच बांधकाम कामगारांना मिळावे. तसेच शासनाने जाहीर केलेल्या सुविधा मिळवून घेण्यासाठी कामगारांनी संघटीत होऊन संषर्घ करावा, असे आवाहन कृषी अभ्यासक विजय जावंधिया यांनी केले. वर्धा जिल्हा इमारत बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्यावतीने महाकाळ येथे आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते विशेष अतिथी म्हणून विजय बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच आशा महाकाळकर तर प्रमुख अतिथी म्हणून बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष यशवंत झाडे, उपाध्यक्ष महेश दुबे, सिटूचे सीताराम लोहकरे, राम ठावरी, पांडुरंग राऊत, महाकाळ शाखाध्यक्ष प्रमोद वगारहांडे, उपाध्यक्ष प्रभाकर धवणे, सचिव प्रभाकर हावरे, अजय भगत, उपसरपंच कल्पना फुन्ने उपस्थित होते. बांधकाम कामगारांना विविध सुविधा मिळवून देणे, सरकारकडे नोंदणी करणे यासाठी सिटू अंतर्गत ईमारत बांधकाम कामगार संघटनेने प्रयत्न करुन जिल्ह्याच्या आठही तालुक्यात ६ हजार ५०० कामगारांची नोंदणी केली आहे. इमारत बांधकाम कामगारांचे काम जेथे चालते त्या सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात कर्मचारी कमी व कायमस्वरुपी कामगार अधिकारी नसल्याने कामे अडकली आहेत. यासाठी संघटना कार्यरत असून लवकरच कामांना गती येईल असे यशवंत झाडे यांनी सांगितले. सीताराम लोहकरे, महेश दुबे यांनीही समयोचित मार्गदर्शन केले कार्यक्रमाप्रसंगी कामगारांनी स्वत: निर्माण केलेल्या चोनकी-ढोलकी कलापथकाची स्फूर्ती गीत सादर केली. प्रदर्शन प्रमोद वगारहांडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर हावरे यांनी केले. संचालन उमेश अग्निहोत्री यांनी तर आभार प्रमोद वगारहांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विकास नेहारे, रमेश नागपुरे, निलेश दुधकोहळे, आनंद नेहारे, माया डोंगरे, नरेश चारभे, विलास देहारे, सुरेखा धवने, ओंकार सोनटक्के, शंकर धवने, देवराव नेहारे, हकीम टागोर, दिवाकर डोळे, विष्णू सोनटक्के, लक्ष्मण दुधकोहळे, शरद थुल, वामन भालशंकर, विकास नगराळे, दिनेश करलुके, सुरेश करलुके, सविता हावरे, शीला खाटिककर, शेवंता डायरे यांच्यासह कामगारांनी सहकार्य केले. ग्रामस्थांचीही यावेळी उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)