शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

समताधिष्ठित बहुजनवादी विचारातच कामगारांचे हित

By admin | Updated: August 30, 2014 02:03 IST

साम्यवादी, गांधीवादी, संघवादी विचारसरणीवर चालणाऱ्या कामगार चळवळी निर्माण झाल्या. परंतु विषमतावादाचा पुरस्कार करणाऱ्या संघटनांच्या ..

वर्धा : साम्यवादी, गांधीवादी, संघवादी विचारसरणीवर चालणाऱ्या कामगार चळवळी निर्माण झाल्या. परंतु विषमतावादाचा पुरस्कार करणाऱ्या संघटनांच्या कामगार चळवळीमुळे बहुजन समाजाच्या विद्युत कामगार कर्मचाऱ्यांच्या हिताचे कोणतेही धोरण राबविले गेले नाही. या कर्मचाऱ्यांचे खरे हित फुले-शाहू-आंबेडकराच्या बहुजनवादी समताधिष्ठित विचारधारेनेच साध्य होऊ शकते, असे प्रतिपादन अ. भा. स्वतंत्र मजूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस जे. एस. पाटील यांनी केले. हिंगणघाट येथील आय. एम. ए. सभागृहात महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रबोधन मेळावा घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रबोधन मेळाव्यात अतिथी म्हणून म. रा.विद्युत वितरण कंपनी प्रविभाग वर्धाचे कार्यकारी अभियंता एस. आर. कांबळे प्रमुख, संघटनेचे राज्य सरचिटणीस नरेंद्र जारोंडे, नागपूर ग्रामीण परिमंडळचे अध्यक्ष आर.आर. नगदेवते, विद्युत वितरण कंपनी हिंगणघाट विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एस. वैद्य, विभागीय पदाधिकारी डी.एम. खैरे, आर्वीचे अधीक्षक अभियंता गायकवाड, गोवर्धन नगराळे आदी उपस्थित होते. संघटनेद्वारे आजपर्यंत शेकडो आंदोलने, निदर्शने, धरणे, मोर्चे काढून बहुजन समाजातील विद्युत कामगार, कर्मचारी, अभियंते आदींच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून दिला असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. त्यामुळे समताधिष्ठित बहुजनवादी विचारधारा कामगारांनी अंगिकारण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी हिंगणघाट विभागातील सेवानिवृत्त विद्युत कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आयोजकांच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष जे. एस. पाटील याचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रबोधन मेळाव्याचे प्रास्ताविक संघटनेचे हिंगणघाट विभागीय अध्यक्ष एन.एम. नाईक यांनी केले. अजय जवादे यांनी संचालन केले. गुणसागर नाईक यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. प्रबोधन मेळाव्याचे आयोजन संघटनेच्या हिंगणघाट विभाग शाखेच्या वतीने करण्यात आले होते.मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी आर.डी. वानखेडे, एन.एम. नाईक, दयानंद हाडके, व्ही.व्ही. चतारे, किशोर कापसे, के.बी. उमरे, एस.व्ही. पाटील, ए.डब्ल्यू. खोब्रागडे, एन.जी. गोडघाटे, एम.सी. शंभरकर, पी.व्ही. जगताप, आर.एल. वाघमारे, बी.डी. पाटील, पाटणकर, डोंगरे, एस. जॉन, गजभिये, नंदकिशोर गोडघाटे यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)