शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगारांची नगर पालिकेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:56 IST

स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटना शाखा सिंदी (रेल्वे)च्यावतीने बांधकाम कामगारावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात तसेच विविध मागण्यांकडे न.प.चे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी एकत्र येत पालिका कार्यालयात धडक दिली.

ठळक मुद्देविविध मागण्या रेटल्या : स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटना शाखा सिंदी (रेल्वे)च्यावतीने बांधकाम कामगारावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात तसेच विविध मागण्यांकडे न.प.चे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी एकत्र येत पालिका कार्यालयात धडक दिली. या आंदोलनाचे नेतृत्त्व संघटनेचे अध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांनी केले.इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करण्यासाठी सरकारी कामगार अधिकारी यांच्या कार्यालयात बांधकाम कामगारांना ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. सर्वच कामगार नोंदणीकृत ठेकेदाराकडे काम करीत नाही. अनेक घरमालकांकडे अस्थाई दैनंदिन बांधकाम कामगार म्हणून काम करतात. अशा अस्थायी स्वरुपाच्या बांधकाम कामगारांची मंडळाकडे नोंदणी व्हावी. त्यांना मंडळाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात यावा. या मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी रेटून लावल्या.सिंदी रेल्वे नगरपालिकेतील लिपीक शासनाच्या नियमांना पाठ दाखवत मनमानी कारभार करीत असल्याने त्याचा त्रास कामगारांना होत असल्याचा आरोप करीत या प्रकरणी न.प. प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सिंदी (रेल्वे) न.प. हद्दीमधील शेकडो बांधकाम कामगाराच्या नोंदण्या रिनिवल न झाल्यामुळे रद्द झाली आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे प्रमाणपत्राची मागणी केली असता विविध कारणे पुढे करून उडवा-उडवीचेच उत्तरे दिल्या जातात. बांधकाम कामगारांना सात ही दिवस प्रमाणपत्र मिळावे अशी व्यवस्था नगरपालिकेत करावी तसेच उद्योग उर्जा कामगार विभाग अधिसुचना दि. १३ एप्रिल २०१४ नियम २००७ च्या ३३(३) या नियमाचे उल्लघंण केल्या प्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी. तसेच नगरपालिका हद्दीतील बांधकाम कामगारांना शासनाच्या मिळणाऱ्या योजने पासुन वंचित ठेऊ नये, आदी मागण्या न. प. मुख्याधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे निवेदन न.प. मुख्याधिकारी डाके यांनी स्विकारले. आंदोलनात कैलाश गायकवाड, नाना कुंभारे, प्रतीभा अंबुलकर, प्रतिभा शिंदे, जीवनकला कुंभारे, राजेश्री तळवेकर, कैलास लोहकरे, पांडुरंग सोनटक्के यांच्यासह मोठ्या संख्येने शहरातील बांधकाम कामगार सहभागी झाले होते.

टॅग्स :Morchaमोर्चा