शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खत कारखान्यात कामगारांचे आंदोलन

By admin | Updated: May 30, 2017 01:11 IST

स्थानिक एमआयडीसी भागातील महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित खत कारखान्यातील ४० कंत्राटी कामगारांनी...

विविध सुविधांसह योग्य वेतन देण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक एमआयडीसी भागातील महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित खत कारखान्यातील ४० कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी रविवार पासून कामबंद आंदोलन सुरू केले. सोमवारी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर योग्य तोडगा न निघाल्याने हे आंदोलन सायंकाळी उशीरापर्यंत सूरू होते.महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित खत कारखान्यात सदर कंत्राटी कामगार गत १० ते १२ वर्षापासून काम करतात. दर वर्षी महामंडळाकडून कंत्राटदार बदलविला जातो. सदर कामगार बऱ्याच वर्षांपासून या खत कारखान्यात काम करीत असले तरी त्यांना पाहिजे त्या सोई-सूविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. २१ मे २०१७ ला नवीन कंत्राटदाराने या ठिकाणी काम घेतले. येथील कामगारांच्या बँकखात्यात ९ हजार ३०० रुपये इतके मासीक वेतन वळते केले जात होते. परंतु, नवीन कंत्राटदाराने कंत्राटी कामगारांच्या वेतनात घट करीत अल्प वेतन देण्याचे धोरण अवलंबले आहे. हा प्रकार कामगारांवर अन्याय करणारा असून योग्य वेतन देण्यात यावे यासह कामगारांना प्राथमिक सोई-सूविधा देण्यात याव्या या मागणीसाठी खत कारखान्यातील कंत्राटी कामगारांनी प्रहारच्या नेतृत्त्वात रविवारपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. सोमवारी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह कामगार अधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. कामगारांच्या मागण्यांवर वेळीच योग्य तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनात प्रहारचे शहर प्रमुख विकास दांडगे, शरद टाले, मुकेश शेंद्रे, अतुल घाडगे, दिलीपसिंग ठाकूर, सुमेध माहूरे, प्रमोद कळणे यांच्यासह आदी कामगार सहभागी झाले आहे.दिले जात होते सात हजार वेतनसदर खत कारखान्यातील कंत्राटी कामगारांना पूर्वी ९ हजार ३०० रुपये मासीक वेतन दिल्या जात होते. मात्र, नवीन कंत्राटदाराने कामगारांच्या वेतनात घट करीत त्यांना ७ हजार ८८ रुपये वेतन देण्याचे निश्चित केल्याने हा प्रकार कामगारांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.आपणाला टर्न बेसीसवर कंत्राट मिळाला आहे. कंत्राटी कामगारांना आपण नियमांना अनुसरून मासीक वेतन देत आहो. सध्या दिल्या जात असलेल्या वेतनापेक्षा जास्त वेतन देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांची असून आपण त्यासंबंधी महामंडळाच्या वरिष्ठांशी बोललो आहे. ते जो निर्णय घेतील त्याची माहिती आपण आंदोलनकर्त्यांना देऊ.- दिलीप गुंजाल, खत कारखान्यातील कंत्राटदार.