शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बहुप्रतिक्षित रेल्वे उड्डाणपुलाचे काम जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:56 IST

मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर पुलगाव-आर्वी मार्गावरील गेटमुळे वाहतुकीची कोंडी होत होती. रेल्वे लाईनमुळे शहरही उत्तर-दक्षिण, असे विभागले गेले आहे.

ठळक मुद्देपाणी पुरवठा धोक्यात क्रॉसिंगजवळ खड्ड्यामुळे अपघाताची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर पुलगाव-आर्वी मार्गावरील गेटमुळे वाहतुकीची कोंडी होत होती. रेल्वे लाईनमुळे शहरही उत्तर-दक्षिण, असे विभागले गेले आहे. यामुळे उड्डाणपुलाची मागणी होती. दोन वर्षांपूर्वी ती मान्य झाली असून ४५ कोटींच्या पुलाचे काम सुरू झाले; पण गेटजवळ खांबासाठी खोदलेल्या २० फुट खोल खड्ड्यामुळे अपघाताची तथा जलवाहिनी फुटल्यास पाणी पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अनेक वर्षापासून या उड्डाणपुलाच्या निर्मितीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. जागा, मुख्य बाजारपेठ बांधकामासाठी लागणारा निधी व काही अन्य कारणांनी उड्डाणपुलाचा प्रश्न रेंगाळला होता. यात हैद्राबाद, भोपाळ या मार्गावर जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू झाली. रेल्वे फाटक बंद राहत असल्याने कित्येक तास जड वाहनांच्या रांगा लागतात. ही कोंडी सुटावी म्हणून लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले व हा प्रश्न मार्गी लागला. सध्या ४५ कोटींच्या उड्डाणपुलाचे काम जोमाने सुरू झाले आहे. यात राज्य शासन ३५ कोटी तर केंद्र शासनाकडून १० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. या उड्डाणपुलाची लांबी ६५६ मीटर तर रूंदी १२ मीटर राहणार आहे. रेल्वेच्या तीन खांबांसह (पिलर्स) एकूण ३४ खांब आहेत. उड्डाणपूल तीन पदरी आहे. पुलाचा उतार आर्वी नाका व दुसºया बाजूचा उतार कॉटन मील भिंतीवर दक्षिणेकडे पंचधारा रोडकडे निघणार आहे. पुलाच्या ३४ पैकी अनेक खांबांसाठी मोठे खड्डे खोदून खांब उभे करण्याचे, नाल्यावरील पुलाचे काम सुरू आहे; पण रेल्वे क्रॉसिंगजवळ खांबासाठी खोदलेला खड्डा हा पुलगाव-आर्वी मार्गाच्या अर्ध्या भागात आहे. या खड्ड्यात पाणी पुरवठ्याची मुख्य जलवाहिनी आहे. खोदकामामुळे जलवाहिनी उघडी पडली असून तिला तीन जोड आहे. जलवाहिनीला आधार नसल्याने ती फुटून शहराचा पाणीपुरवठा प्रभावित होऊ शकतो. शिवाय अर्धा रस्ता खोदकामात असून उर्वरित रस्त्याने वाहतूक सुरू आहे. खड्ड्यात असलेल्या पाण्यामुळे ओलसर माती घसरल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता संभाव्य धोका लक्षात घेता संबंधित विभागाने येथील कंत्राटदारास सूचना दिल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी सुरू असलेल्या खोदकामाकडे बांधकाम विभाग तथा संबंधित कंत्राटदार कंपनीने लक्ष देत उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.