शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

व्हिल्स इंडियाच्या कामगारांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:21 IST

येथील औद्योगिक वसाहतीतील व्हिल्स इंडिया कंपनीच्या स्थायी व अस्थायी कामगारांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले. कामगारांच्या मागण्यासंदर्भात कंपनी प्रशासनाला चार पत्रे देवून सुद्धा दखल घेतली नसल्याने संघटनेच्यावतीने रोष व्यक्त करण्यात आला....

ठळक मुद्देकंपनी व्यवस्थापनाच्या मनमानीमुळे रोष : कामगारांना कमी करण्याच्या धमकीने भडका

ऑनलाईन लोकमतदेवळी : येथील औद्योगिक वसाहतीतील व्हिल्स इंडिया कंपनीच्या स्थायी व अस्थायी कामगारांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले. कामगारांच्या मागण्यासंदर्भात कंपनी प्रशासनाला चार पत्रे देवून सुद्धा दखल घेतली नसल्याने संघटनेच्यावतीने रोष व्यक्त करण्यात आला.या कंपनीत जिल्ह्यातील कामगारांची संख्या अधिक आहे. यापैकी बरेचशे कामगार वर्धा मुक्कामी राहत असून रात्री १२ वाजेनंतर शिफ्ट संपल्यानंतर त्यांना दुचाकीने जावे लागते. यामुळे कंपीच्यावतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुरविलेली बससेवा कंपनीच्या टिममेंबर व टेक्निशियनला सुद्धा लागू करण्यात यावी अशी मागणी कामगारांकडून करण्यात आली. या कंपनीत ठेकेदार पद्धतीत काम करणाºया व अस्थायी कामगारांना १२ तास पर्यंत राबवून घेतले जात आहे. या कंपनीत पटले कॉन्ट्रक्टर यांच्या व्यतिरिक्त ओईएस, जेईएस, एसईडब्ल्यु, डिके, एसकेएस, नागा आदी कॉन्ट्रक्टर काम पाहत असून पावणे तीनशे कामगार कार्यरत आहे. त्यांच्याकडून आठ तासांऐवजी १२ तास काम करून घेतल्या जात आहे. कामगारांचा पीएफ कापला जातो; परंतु त्यांचा नंबर दिल्या जात नाही. कुशल व अकुशल दराने वेतनाची वर्गवारी करुन वेतन दिले जात नाही. कामगारांना वेतन स्लीप दिली जात नाही. आदी अनेक प्रकारे कामगारांची लुट केली जात आहे.बहुतांश कामगार गरजु असल्यामुळे त्यांना वेळोवेळी कामावरुन कमी करण्याची धमकी दिली जाते. गत दोन दिवसापासून संप सुरू आहे; परंतु याबाबत कंपनीने कोणताही पुढाकार न घेता कामगारांची आर्थिक कोंडी केली आहे. कारखाना प्रशासन मनमानी कारभार करीत असल्याने याबाबत मानव संसाधन, कामगार आयुक्त जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना समज देण्याची मागणी कामगार संघटनेचे दिलीप उटाणे, अतुल ठाकरे, गणेश रावेकर, रशीक पोपटकर, बादल भालशंकर, पवन ढगे, पंकज हागोडे यांच्यासह कामगारांच्यावतीने करण्यात आली आहे.