शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

तरोड्याच्या नालाखोलीकरण कामांसाठी महिलांचा पुढाकार

By admin | Updated: May 30, 2015 00:20 IST

आदर्श गाव म्हणून खासदार रामदास तडस यांनी तरोडा या गावाची निवड केली. आदर्श गावाच्या संकल्पनेनुसार विकास ....

कुंड नाल्याचे ३०० मीटर खोलीकरण : १० दिवसात काम करणार पूर्णवर्धा : आदर्श गाव म्हणून खासदार रामदास तडस यांनी तरोडा या गावाची निवड केली. आदर्श गावाच्या संकल्पनेनुसार विकास करतानाच शेती व पिण्याच्या पाण्याचे स्वयंपूर्णतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण असलेल्या कुंड नाला खोलीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला. त्याचे नारळ सरपंच सुनिता टिकले यांनी फोडले. आदर्श गावासाठी मूलभूत सुविधांचा विकास करतानाच टंचाईमुक्त गाव ही संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली. यात गावाशेजारी असलेल्या कुंड नाल्याचे ३२० मीटर खोलीकरण करून १५.२४ टीसीएम पाणी साठविण्याची क्षमता निर्माण होणारे काम महिलांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. उल्हास नाडे, तालुका कृषी अधिकारी बिपीनकुमार राठोड, स्वप्नील शेळके, एस.के. राऊत उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र या राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांतर्गत तरोडा गावाची निवड झाली आहे. ३२० मीटर नाल्याच्या खोलीकरणामुळे १५.२४ टीसीएम पाणी साठी निर्माण होणार आहे. सोबत पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताचे बळकटीकरण होत १२.५७ हेक्टर क्षेत्रासाठी संरक्षित सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. या कामावर ५ लक्ष २४ हजार ५३४ रुपयांचा खर्च असून हे काम येत्या दहा दिवसांमध्ये पूर्ण होईल असे डॉ. नाडे यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावातील पाणी आराखडा तयार करण्यात आला आहे. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन तसेच पिण्याच्या पाण्यासाठी निर्माण होणारी टंचाई गावाला आवश्यक असलेले पाणी तसेच उपलब्ध पाण्याच्या विनियोगाचे मुल्यमापन करण्यात आले आहे. पावसाचे पाणी अडविण्यासाठी कुंड नाल्याचे खोलीकरण करण्यासह साठवण बंधारे गाव तलाव, सिमेंट नालाबांध आदींच्या दुरूस्तीसह नवीन कामाचे ठराव ग्रामसभेतर्फे घेण्यात आले आहे. यासाठी १८०.५४ लक्ष रुपयांच्या निधीची मागणी आहे. यावेळी उपसरपंच गणेश तिमांडे, सदस्य वर्षा भगत, बेबी उघडे, मुक्ता चांभारे, ज्योती बोरकर, मंगला झाडे, वनिता बावणे, गीता चांभारे, वनिता चांभारे, मंदा बलखंडे, ग्रा.पं. सदस्य उत्तम चांभारे, ग्रामसेवक इवनाते, आर.एम. आरगे, एस.एस. मुंडे आदी यावेळी उपस्थित होते.(प्रतिनिधी)