शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

मायक्रो फायनान्स विरोधात सेलू येथे महिलांचा मोर्चा

By admin | Updated: January 3, 2017 00:58 IST

जिल्हाभर नाही तर राज्यभर मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून महिलांना कर्ज देवून ते वसूल करण्याकरिता

पोलिसांत तक्रार : वसुली एजंटकडून महिलांना अश्लिल शिवीगाळ व धमकी सेलू : जिल्हाभर नाही तर राज्यभर मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून महिलांना कर्ज देवून ते वसूल करण्याकरिता नाहक त्रास देण्याचे प्रकार सुरू झाले आहे. या संदर्भात महिलांकडून मोर्चे निघत आहेत. हा प्रकार ग्रामीण भागात अधिक असून त्रस्त महिलांनी सोमवारी सेलू तालुक्यात मोर्चा काढला. या महिलांनी हा मोर्चा थेट पोलीस ठाण्यात नेत या एजंटांविरोधात तक्रार दाखल केली. मायक्रो फायनान्स कंपनीकडून प्रारंभी महिलांना आकर्षक कर्जाचे आमिष देत त्यांचे गट तयार करून कर्जाचे वितरण करण्यात आले. आता दिलेले कर्ज वसून करण्याकरिता या एजंटांकडून महिलांना त्यांच्या घरी जावून अपमानित करण्यात येत आहे. शिवीगाळ करून त्यांना धमक्या देण्याचे प्रकार घडत आहे. या विरोधात महिलांनी मोर्चे काढणे सुरू आहे. या महिलांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी कर्जाची परतफेड करण्यात आली आहे. मात्र या एजंटकडून कर्ज बाकी असल्याचे सांगण्यात येत असून महिलांना अपमाणित करण्यात येत आहे. यामुळे या कंपनीच्या एजंटने यात घोळ करून भ्रष्टाचार केल्याचा आरोपही महिलांनी पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनातून केला आहे. यामुळे महिलांनी मोर्चा काढून पोलीस ठाण्यात कंपनीच्या एजंट विरूद्ध तक्रार दिली असून यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)