शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी महिलांचा ‘एल्गार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:38 IST

अजूनही त्यांचे आईच्या कुशीत बसून सर्व हट्ट पुरवून घेण्याचे वय, दुधाचे दात अजूनही सुकलेले नाहीत, अशा अजाणत्या वयात त्या कोवळ्या कळ्या काही सैतानाच्या हव्यासाने गर्भगळीत झाल्या. नुकतेच उमलू लागलेल्या त्या कळ्यानी आपल्या असुरक्षित भविष्याची दाद....

ठळक मुद्देउपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना निवेदन : पीडितेला न्याय मिळवून देण्याकरिता युवतींसह बालिकाही आल्या पुढे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : अजूनही त्यांचे आईच्या कुशीत बसून सर्व हट्ट पुरवून घेण्याचे वय, दुधाचे दात अजूनही सुकलेले नाहीत, अशा अजाणत्या वयात त्या कोवळ्या कळ्या काही सैतानाच्या हव्यासाने गर्भगळीत झाल्या. नुकतेच उमलू लागलेल्या त्या कळ्यानी आपल्या असुरक्षित भविष्याची दाद मागण्यासाठी मोर्चा काढत येथील उपविभागीय महसूल कार्यालय गाठले. यावेळी विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या मोर्चात युवतींसह बालिका व महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.सदर निवेदनातून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनासह सरकारने ठोस पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर बलात्कारासारखे निंदनिय प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणीही यावेळी करण्यात आली. उल्लेखनिय म्हणजे या मोर्चाचे नेतृत्त्व युवती व छोट्या मुलींनी केले. मोर्चा उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडकताच मोर्चाचे नेतृत्त्व करणाऱ्या युवतींच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे यांच्याशी संवाद साधत विविध मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. यावेळी समाधान शेंडगे यांनी हिंगणघाट परिसरात अशा दुदैर्वी घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याविषयी आंदोलनकर्त्यांचे मत जाणून घेतले.छत्रपती शिवरायांनी स्वराज्यामध्ये ज्या पद्धतीच्या शिक्षेची तरतूद केली होती त्याच धर्तीवर अशा गुन्ह्याकरिता कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी. अशा गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर मोर्चा उपविभागीय महसूल कार्यालयावर धडकला. मोर्चात स्मिता पांढरे, सारिका मानकर, नम्रता बकाने, समीक्षा चौधरी, राजश्री विरुळकर, सुरेखा खांडरे, वैशाली चरडे, टिनाली कुंभारे, आस्था मानकर, रिद्धी मानकर, विधी पांढरे, निधी चौधरी, गार्गी खांडरे, धनंजय बकाने, समीर पांढरे, रवी काटवले, उमेर खान, सचिन चरडे, नंदू वाघमारे, रमजान शेख, धनराज कुंभारे, देवा जोशी, सुरेश चौधरी, अनिल आडे, डॉ. प्रमोद गोहणे आदी सहभागी झाले होते.अधिकाºयांशी केली चर्चामोठ्या संख्येने महिला, युवती व बालिकांचा समावेश असलेल्या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाºयांना सादर करण्यात आले. निवेदन देताना उपविभागीय महसलू अधिकाºयांशी मुलींनी चर्चा केली.