शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पोलिसांच्या तत्परतेने मिळाली महिलेची बॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2015 02:31 IST

अकोला येथून वर्धेला येण्याकरिता रेल्वेत बसलेल्या महिलेची बॅग गाडीतच राहिली. याची माहिती तिने वर्धा रेल्वे पोलिसांना दिली.

४४ हजारांचा ऐवज सुखरुप : अकोल्याच्या महिलेला बॅग केली परतवर्धा: अकोला येथून वर्धेला येण्याकरिता रेल्वेत बसलेल्या महिलेची बॅग गाडीतच राहिली. याची माहिती तिने वर्धा रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी लागलीच गाडीत असलेल्या पोलिसाला माहिती देत सदर बॅग नागपूर रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतली. ही बॅग दुसऱ्या रेल्वे गाडीने पाठवून वर्धा रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिसांजवळ आलेली बॅग तपासून ती तक्रारकर्ती महिला तारा सारंगधर खंडारे (५५) रा. अकोला यांच्या स्वाधीन करण्यात आली. ताराबाईने बॅग तपासणी केली असता, बॅगमधील सर्वच साहित्य सुखरूप असल्याचे निदर्शनास आले. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. पोलीस सूत्रानुसार, अकोला येथील तारा खंडारे या पती व मुलीसोबत वर्धेला येण्याकरिता गीतांजली एक्स्प्रेसमध्ये बसल्या. त्यांच्याकडे सामान्य वर्गाचे तिकीट असताना त्या आरक्षित डब्यात चढल्या. वर्धा रेल्वे स्थानक येताच लगबगीने उतरल्या. यात त्यांची बॅग गाडीतच राहिल्याचे लक्षात आले. तोपर्यंत गीतांजली एक्स्प्रेस वर्धेवरून रवाना झाली होती. त्यांनी तात्काळ रेल्वे पोलीस स्थानक गाठत प्रकाराचा माहिती दिली. यावेळी कार्यरत असलेले कर्मचारी उमेश चनेकार व जमादार गोटेफोडे यांनी लगेच गाडीत असलेले पोलीस कर्मचारी रावत यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करुन माहिती दिली. रावत यांनी मिळालेल्या सूचनेनुसार व बॅगेच्या वर्णनानुसार चौकशी करून बॅग ताब्यात घेतली.(प्रतिनिधी)