शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी त्यांच्यावर होणाºया अन्यायाविरूद्ध आवाज उठवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 23:24 IST

अमृता फडणविस : सिद्धिविनायक गणपती मंदिरात महिलांकरिता विशेष चर्चासत्र; मुख्यमंत्री दत्तक ग्रामच्या कामांनाही केला प्रारंभ

ठळक मुद्देमहिलांनी त्यांच्यावर होणारा अन्याय मुकाट्याने सहन करू नये. होणाºया अन्यायाविरूद्ध आवाज उठवावा, असे आवाहन अमृता फडणविस यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : महिलांनी त्यांच्यावर होणारा अन्याय मुकाट्याने सहन करू नये. होणाºया अन्यायाविरूद्ध आवाज उठवावा, असे आवाहन अमृता फडणविस यांनी केले. येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरात आयोजित ग्रामस्थांच्या चर्चासत्रात उपस्थित महिलांशी चर्चा करताना त्या बोलत होत्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केळझर गाव दत्तक घेतले आहे. या गावात दत्तक ग्रामयोजनेंतर्गत येथे वॉटर एटीएम (जल शुद्धीकरण केंद्र) व तसेच नवीन बसस्थानाकरिता मंजूर निधीच्या धनादेशाचे वितरण अमृता फडणविस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खा. रामदास तडस, आ.डॉ. पंकज भोयर, माजी खासदार सुरेश वाघमारे, जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री गफाट, महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, सेलू पं.स. सभापती जयश्री खोडे, जि.प. सदस्य विनोद लाखे, राणा रणनवरे, सरपंच रेखा शेंदरे, मुख्यमंत्र्याच्या स्वीय सचिव आशा पठाण, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपसरपंच फारूख शेख, ग्रा.पं. चे सर्व सदस्य सिद्धीविनायक गणपती मंदिराचे अध्यक्ष माधव ईरूटकर, सचिव महादेव कापसे, मंदिराचे सर्व विश्वस्थ व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वप्रथम बाजार चौकातील कुशावर्ती विहिरीवर लावलेले वॉटर एटीएम (जल शुद्धीकरण यंत्र) चे व टाटा टिप्परचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर सिद्धीविनायक गणपती मंदिरात ग्रामस्थांशी चर्चा व लकी ड्रॉ द्वारे महिलांना साडी वितरणाचा कार्यक्रम झाला. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी प्रास्ताविकेतून मुख्यमंत्री दत्तक ग्राम योजनेतून केळझरच्या विकास करण्याकरिता पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याचे सांगितले. तसेच खासदार रामदास तडस यांनी येथील सिद्धीविनायक गणपती मंदिराचे ‘स्वदेशी दर्शन’ या केंद्र सरकारच्या योजनेत समाविष्ट करण्याकरिता ससंदेत प्रश्न उपस्थित केल्याचे सांगितले.अमृता फडणविस यांनी सिद्धीविनायक गणपती मंदिराच्या मागे असलेला गणेश तलावचे खोलीकरण व सौंदर्यीकरणासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. यावेळी वॉटर एटीएम सेंटर तयार करून दिल्याबद्दल प्रसन्न मोहिले व डब्ल्यूसीएलच्या सीएसआर निधीतून टाटा टिप्पर करिता ५ लाख ३९ हजार २९९ रुपयांचा निधी तसेच नवीन बसस्थानकाकरिता १० लक्ष ४० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अरूणकुमार सिंग यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. संचालन किशोर महाजन यांनी केले.आरोग्य मॅराथॉनचे उद्घाटनपं. दिनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सेलू येथील दिपचंद चौधरी विद्यालय येथे आयोजित मुख्यमंत्री आरोग्य मॅराथॉनचे उद्घाटन अमृता फडणविस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी खासदार दत्ताजी मेघे यांची उपस्थिती होती.बालकाच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सोबतच वर्धा हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे जेथे लोकप्रतिनिधी, भाजपा तसेच भायुमोचे पदाधिकारी, भाजपा तसेच भाजयुमोचे पदाधिकारी, जि.प., पं.स. चे सर्व सदस्य एकत्रित येवून आरोग्यासाठी मेहनत घेत आहे, असे मत व्यक्त केले. अविनाश देव, नगर पंचायत सेलूचे गटनेता शैलेंद्र दफ्तरी, भाजपा तालुकाध्यक्ष अशोक कलोडे, सेलू शहर अध्यक्ष वरूण दफ्तरी तसेच भाजपा व भाजयुमोचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.