शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी मोठे व्यावसायिक बनून आर्थिक प्रगती साधावी

By admin | Updated: June 19, 2017 01:15 IST

व्यवसायाची वाढ करावयाची असल्यास कुशल कामगाराची आवश्यकता असते. महिलांनी कुशल कामगार बनूनू मोठे व्यवसायिक होत

प्रदीप नाथ : महिलांसाठी लेदर बॅग व ड्रेस डिझायनिंग प्रशिक्षण शिबिरलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : व्यवसायाची वाढ करावयाची असल्यास कुशल कामगाराची आवश्यकता असते. महिलांनी कुशल कामगार बनूनू मोठे व्यवसायिक होत आर्थिक प्रगती साधावी करावी, असे प्रतिपादन भारतीय लघु उद्योग विकास बँकेचे महाप्रबंधक प्रदीप नाथ यांनी केले. ते महिलांसाठी आयोजित लेदर बॅग व ड्रेस डिझाईनिंग प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते.व्यासपीठावर नॅशनल इंन्स्टिट्युट आॅफ वुमन चाईल्ड अँड युथ डेव्हलपमेंट नागपूरच्या रोहिणी भालेराव, रोटरी क्लबच्या सुनीता इथापे, सीएमआरसी व्यवस्थापक नलू गौळकर, आशीष मोडक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या सहायाने व नॅशनल इंन्स्टिट्युट आॅफ वूमन चाईल्ड अँड युथ डेव्हलमेंट नागपूर व सयंसमर्थन लोक संचालित साधन केंद्र सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने सेलू तालुक्यातील महिला बचत गटाच्या महिलांकरिता एक महिन्याच्या कालावधीचे लेदर बॅग व ड्रेस डिझाईनींग कौशल्यता विकास प्रशिक्षण शिबिराचे सेलू येथे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तालुक्यातील महिला बचत गटांच्या महिला सहभागी झाल्या आहेत. मार्गदर्शन करताना सुनीता इथापे यांनी महिलांनी स्व ची भावना निर्माण करणे गरजेचे आहे. आपले व्यक्तीमत्त्व व कौश्यल्याचा वापर करून आपला व्यवसाय वाढविणे गरजेचे आहे. बाजारात कुठल्या वस्तूची जास्त मागणी आहे त्याचा अभ्यास करून त्यापद्धतीने वस्तूची निर्मिती करणे आवश्यक असून तसे प्रशिक्षण घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाच्या विक्री करता हक्काची जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. महिलांनी चुल आणि मुल या रूढी परंपरा मोडकळीस काढून पुरूषांच्या खांद्याला खांदा लाऊन आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रगती करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. रोहिणी भालेराव यांनी महिला बचत गटाना मदत करण्यासाठी आमच्या संस्थेच्या माध्यमातून अश्या कार्यशाळेचे नेहमी आयोजन करण्यात येईल असे सांगितले. यावेळी आशीष मोडक यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन छाया गायकवाड यांनी केले. तर उपस्थितांचे आभार रोहिणी भालेराव यांनी मानले. कार्यक्रमाला परशुराम, सेलघरे, कांबळे, सुटे, लोखंडे आदींनी सहकार्य केले.