शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसंबंधी निर्णयात महिलांचा सहभाग गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 23:04 IST

महिला सशक्तीकरण आवश्यक आहे. शेती व शेती संबंधी निर्णयामध्ये महिलांनी जास्तीत जास्त सहभाग वाढविला पाहिजे, असे प्रतिपादन उमेद अभियानाचे अतुल शेंद्रे यांनी केले.

ठळक मुद्देअतुल शेंद्रे : कृषी विज्ञात केंद्रातील महिला सशक्तीकरण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महिला सशक्तीकरण आवश्यक आहे. शेती व शेती संबंधी निर्णयामध्ये महिलांनी जास्तीत जास्त सहभाग वाढविला पाहिजे, असे प्रतिपादन उमेद अभियानाचे अतुल शेंद्रे यांनी केले. ते सेलसूरा येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित महिला सक्षमीकरण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत वर्धा सेलसूरा येथील कृषी विज्ञान केंद्रात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी समन्वयक डॉ. प्रशांत उंबरकर, शास्त्रीय सल्लागार समिती सदस्य संध्या माणिकपुरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान पशु व दुग्ध संवर्धन विषयाचे शास्त्रज्ञ डॉ. धनराज चौधरी यांनी कुक्कुटपालन व कुक्कुटपालन दरम्यान घ्यावयाची काळजी तसेच तंत्रज्ञान व मार्केटींग या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कृषी व किसान कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार शेतीला व्यावसायिक दृष्टीकोणातून महत्व प्राप्त होण्यासाठी किसान महिला सशक्तीकरण आवश्यक आहे. करीता महिला किसान दिवस देशभरात साजरा करणे गरजेचे आहे. महिलांना फक्त मजूर म्हणून संबोधिले जाते. परंतु पिकांच्या लागवडीपासून ते पीक काढणी पर्यंतची जास्तीत जास्त कामे ही महिलाच करतात, असे यावेळी मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमात महिलांना ट्रान्सप्लांटर बद्दल प्रात्याक्षिकातून माहिती देण्यात आली.मार्गदर्शन करताना शास्त्रीय सल्लागार समिती सदस्या संध्या माणिकपुरे यांनी शेती दरम्यान येणाºया समस्यांना कसे सामोरे जावे यावर उदाहरणे देत मार्गदर्शन केले. शेतीमध्ये महिलांचा सहभाग वाढावा याकरिता कृषी व किसान कल्याण मंत्रालय तर्फे ३० टक्के निधी हा किसान महिला विकासासाठी देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमात १३५ महिलांनी सहभागी होऊन विविध विषयांची माहिती जाणून घेतली. कार्यक्रमादरम्यान काही महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अंकिता अंगाईतकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. कांचन तायडे यांनी मानले. सदर उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या न्याय हक्कासह विविध व्यवसायांची माहिती माहिती देण्यात आली. यावेळी महिलांना शासनाच्या विविध योजनांचीही माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कृषी विज्ञान केंद्र, सेलसुराचे विशाल उंबरहांडे, प्रा. उज्वला सिरसाट, गजानन म्हसाळ, किशोर सोळंके, पायल उजाडे, वैशाली सावके, समीर शेख, प्रवीण भुजाडे यांच्यासह कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाºयांनी सहकार्य केले.विविध शेतीपूरक व्यवसायाची माहितीसेलसूरा येथील कृषी विज्ञान केंद्रात पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात १३५ महिलांनी सहभागी होऊन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी महिलांना विविध शेतीपूरक व्यवसायाची माहिती सोप्या शब्दात दिली. इतकेच नव्हे तर यावेळी मान्यवरांनी महिलांना शासनाच्यातर्फे राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती दिली.