शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कापूस वेचणाऱ्या महिला मजुरांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 21:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी मजुरापुढे हात टेकले आहे. सितादहीचा वेचा झाल्यानंतर कापसाची वेचणीच झाली ...

ठळक मुद्देसीतादहीच्या वेच्यानंतर कापूस झाडावरच

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी मजुरापुढे हात टेकले आहे. सितादहीचा वेचा झाल्यानंतर कापसाची वेचणीच झाली नाही. त्यामुळे शेत कापसाने पांढरे शुभ्र दिसत आहे. झाडावर एकही बोंड फुटायचे बाकी नाही. हा वेचा वेचल्यावरं कपाशीची उलंगवाडी होणार आहे. मात्र कापूस वेचणीसाठी मजुर मिळत नसल्याने पाऊस आल्यास कापूस मातीमोल होण्याची भिती शेतकऱ्यांना आहे.यावर्षी सितादहीचा पहिला वेचा एकरी एक ते दोन क्विंटलचा झाला. त्यानंतर वेचा झालाच नाही. बहुतेक शेतकऱ्यांची शेतातील कपाशीची झाडे पांढरी शुभ्र झाली. आता हाच शेवटचा वेचा आहे. आता पाऊस आला नाही व मजुर मिळाले तर प्रति एकर दोन-तीन क्विंटल कापूस घरी येईल. सरासरी चार ते पाच क्विंटल कापसाचा उतारा आहे. शेतकºयाचे गणित विस्कटले आहे. बाजारातील कापसाचे दरही परवडणारे नाही. मेटाकुटीस आलेल्या शेतकºयांचा संसारच विस्कळीत झाला आहे. हातातोंडाशी आलेल्या कापूस वेचणीचा मेळ जुळत नसल्याने व निसर्गाच्या सततच्या फटक्याने शेतकऱ्याचे बजेटच विस्कटले आहे. सध्या शेतकरी अडचणीत आहे.व्यापाऱ्यांकडून १०० ते २०० रूपयांनी पिळवणूककपाशीला यंदा ५५०० रूपये प्रतिक्विंटल भाव आहे. मात्र सर्वच शेतकऱ्यांना तो मिळत नाही. कापसाची गाडी खाली केल्यावर पुन्हा व्यापाऱ्यांचे नखरे सुरू होते. व शंभर, दोनशे कमी भाव दिल्या जातो. नाहीतर कापसाच्य गुणवत्तेबद्दल शंका उपस्थित केल्या जाते.तरूण शेतकºयांनी शेती व्यवसायाकडे जावून आधुनिक पध्दतीने शेती केली. खर्च व उत्पन्न यांचा मेळ न बसल्याने त्यांच्या इच्छाशक्तीचा कोंडमारा झाला. सिंचनाची व्यवस्था नसणाऱ्यांना जबरदस्त फटका बसलामजुर महिलांना सरासरी १३० रूपये मन (२० किलो) या प्रमाणे कापूस वेचाईचा दर आहे. एका दिवसात एक महिला ५० ते ६० किलो कापूस वेचते.नव्या पिढीने शेती व्यवसायात रस दाखविला. आधुनिक तंत्रज्ञान वापरले मात्र मजुरापुढे व निसर्गापुढे हात टेकले. चार पैसे उरत नसेल तर शेती कोण करणार हा आम्हालाच पडलेला प्रश्न आहे.- मनोज बोबडे, युवा शेतकरी, वडगाव (कला).