शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

खापरीच्या महिलांनी दारूबंदीसाठी पुकारला एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST

खापरी गावात दारु गाळण्याचे ठिकठिकाणी मिनी कारखाने आहे. सकाळपासून गावात दारु पिणाऱ्यांचे जत्थे दारुविक्रेत्यांच्या घराकडे जाते. येथे उत्पादित झालेली दारु बाहेर गावातही पोहचवित होते. या सर्व घडामोडींचा परिणाम अनेक कुटुंबावर झाला. अनेकांच्या कुटुंबाची वाताहात झाली. महिलांना पतीकडून विनाकारण मारण्याचे प्रकार वाढले.

ठळक मुद्देदोन दिवस हातभट्टया फोडल्या : महिला पोलीस पाटलांनी दिले बळ

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तालुक्यातील खापरी (मुंगापुर) येथील महिलांनी गावातील अवैध दारुच्या भट्टया व दारुविक्री विरोधात कंबर कसली आहे. दारुभट्टयांवर धाड टाकून तेथील मोहा सडवा रसायन व साहित्य नष्ट करण्यात आले. गावच्या महिला पोलीस पाटील यांनी त्यांना बळ दिले तर ठाणेदारांनीही महिलांच्या या दारुबंदी एल्गाराला कायदेशीर मदत करुन महिलांचे संसार उद्धवस्त करणाऱ्या दारू विके्रत्यांवर कारवाईचा सपाटा सुरू केला आहे.खापरी गावात दारु गाळण्याचे ठिकठिकाणी मिनी कारखाने आहे. सकाळपासून गावात दारु पिणाऱ्यांचे जत्थे दारुविक्रेत्यांच्या घराकडे जाते. येथे उत्पादित झालेली दारु बाहेर गावातही पोहचवित होते. या सर्व घडामोडींचा परिणाम अनेक कुटुंबावर झाला. अनेकांच्या कुटुंबाची वाताहात झाली. महिलांना पतीकडून विनाकारण मारण्याचे प्रकार वाढले. मुलांच्या शिक्षणाकडे पालकांचे दुर्लक्ष होवू लागले. घरात उपवास पडण्याची वेळ आली. पिणारे पुरुष जास्त असल्याने गावात दारुड्यांचा बाजार वाढला. दारुच्या भट्यांचा गावा शेजारी धुर वाढला. लाखोची उलाढाल होवू लागली. घरातील कर्तेपुरुष व नवीपिढी बरबाद होतांना पाहुन काही महिला एकत्र आल्या. त्यांनी महिला पोलीस पाटील नम्रता गव्हाळे यांच्याशी चर्चा करुन सर्व महिलांनी एकत्र होवून पहिल्याच दिवशी हातात लाठ्या घेवून सपासपा पाऊल टाकील जंगलव्याप्त परिसरातील दारुभट्टी शोधून काढली व सर्व सडवा, रसायनासह भट्टी उद्धवस्त केली. ठाणेदार सुनील गाडे यांना माहिती देताच ते खापरीत पोेहचले व सर्व रणरागिनींच्या धाडसाचे कौतुक करुन सर्व महिलांशी पाठीशी असल्याचा शब्द दिला. सतत दुसºयाही दिवशी महिलांनी भट्टीवर धाड घालून सडवा रसायनला माती मोल केले. महिलांचा हा रुद्रावतार पाहुन खापरी सह आजुबाजुच्या गावात धडकी भरली आहे. दारुबंदी कमिटी अध्यक्ष प्रिया गव्हाळे, उषा बाराहाते, वनिता धोंगडे, उज्वला पिंपळे, कमल दुधवडे, विद्या दुधबडे, राधा कोरडे, मंगला वैद्य, वनिता पिंपळे, दुर्गा वास्कर, सरला दुधबडे, अर्चना वैद्य, संगीता कोहळे आदींनी या कामात सहभाग नोंदविला.खापरी गावात महिलांचा दारुबंदी साठीचा एल्गार सुरुच राहिल. गावात दारुचा थेंब मिळणार नाही व कुणीही दारुभट्टया लावण्याचे धाडस करणार नाही. अशी परिस्थिती आम्हाला निर्माण करायची आहे. महिलांना गावचे सरपंच व प्रतिष्ठित मंडळी मदत करीत आहे.-नम्रता गव्हाळे, पोलीस पाटील खापरी(मुंगापूर)