शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महिला काँग्रेसही पुरूषांच्या बरोबरीने दिसणार!

By admin | Updated: November 5, 2015 02:27 IST

जगात ५० टक्के महिला आहेत. काँग्रेसने महिलांना कधीही दूर ठेवले नाही. राजीव गांधींनंतर नेत्या सोनिया गांधी यांनीसुद्धा

राजेश भोजेकर ल्ल वर्धाजगात ५० टक्के महिला आहेत. काँग्रेसने महिलांना कधीही दूर ठेवले नाही. राजीव गांधींनंतर नेत्या सोनिया गांधी यांनीसुद्धा महिलांना सत्तेत ५० टक्के आरक्षणांचा वाटा दिला. यापुढे महिला काँग्रेसही काँग्रेस कमिटीच्या खांद्याला खांदा लावून पक्षाची धुरा वाहताना दिसणार आहे. युवती काँग्रेसची स्थापना व झोन अध्यक्षांच्या नियुक्त्या याचाच एक भाग असेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष चारूलता टोकस यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना दिली.महिला संघटन पाहिजे तसे मजबूत नाही. संघटनेला बळ देण्यासाठी काही जुन्या सक्षम पदाधिकाऱ्यांना कायम ठेवणार असून लवकरच नव्या पदाधिकारी व प्रभारीच्या नियुक्त्या केल्या जातील. गाव, तालुका, बुथनिहाय संघटनात्मक बांधणीवर भर असेल. पद घेऊन शांत बसणाऱ्यांना वाव नाही. प्रत्येक पदाधिकाऱ्यांना एक ‘फॉरमॅट’ दिला असून त्यामध्ये प्रत्येक महिन्यात केलेल्या कामाचा अहवाल त्यांना सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आठवड्यात किमान चार महिलांचे मत काँग्रेसकडे वळविण्याची जबाबदारी प्रत्येकाकडे सोपविली आहे, असेही टोकस म्हणाल्या.युपीए १ व २ च्या कार्यकाळात केंद्र व महाराष्ट्रात महिलांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात आल्या. त्यावर जागृती केली जाणार आहे. महिलांचा सामाजिक दर्जा उंचावणे, हे उद्दिष्ट यापुढे असणार आहे. बचत गट प्रशिक्षणावरही भर असणार आहे. केंद्रात व राज्यात सत्तांतर झाले. नव्या सरकारला संधी देणे भाग होते. यामुळे काँग्रेसने सुरुवातीच्या काळात बघ्याची भूमिका घेतली. नव्या सरकारच्या काळात महागाईने डोके वर काढले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालेले आहे. महिलांबाबत उदासीनता बाळगल्याचे दिसून येते, असा आरोपही त्यांनी केला. दिल्लीत राहते, हा आरोप साफ खोटा आहे. यापूर्वी अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीचे कार्यकारिणी सदस्य होते. दरम्यान, पक्षश्रेष्ठींनी निवडणुकीच्या काळात मोठी जबाबदारी दिली होती. जम्मू व इतर राज्यात पक्षाचे काम करीत होते. आता पूर्णवेळ मुंबईला स्थायिक झाले आहे. मुंबईत असले तरी सतत राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. जेव्हापासून नेते राहुल गांधी, सोनिया गांधी व महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रभा ओझा यांनी प्रदेध्याक्षाची जबाबदारी दिली, तेव्हापासूनच राज्यात प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली आहे. ३१ आॅक्टोबरला उस्मानाबाद येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी ‘महिला दुष्काळ परिषद’ हा पहिला कार्यक्रम होता.आगामी निवडणुकांमध्ये महिलांना तिकीट देताना ती नेत्यांची मुलगी वा पत्नी आहे, ही पात्रता लक्षात घेतली जाणार नाही. स्व-कर्तृत्वावर स्वत:ची वेगळी छाप पाडणाऱ्या महिलांनाच प्राधान्य दिले जाईल. युवक काँग्रेसप्रमाणे युवतींनाही पुढे आणण्याचा प्रयत्न आहे. अन्यायग्रस्त, पीडित महिलांना न्याय देण्यासाठी ‘हल्लाबोल कमिट्या’ स्थापन करण्यात येणार आहे. सोबतच महिला व्यावसायिक व स्वयंसेवी संस्थांचेही सेल कार्यान्वित होणार आहे. मोठ्या शहरांत महिला काँग्रेस कमिटीचा भार अध्यक्ष या नात्याने एकाच महिलेवर असतो. तो कमी व्हावा, यासाठी झोननुसार जबाबदाऱ्या निश्चित केल्या जाईल. या अनुषंगाने आगामी काळात महिला काँग्रेस कमिटी पुरूष संघटनांच्या बरोबरीने दिसणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.वारसाहक्क असता तर केव्हाच आमदार-खासदार झाले असते४प्रभाताई राव यांची मुलगी असल्याचा अभिमान आहे; पण त्यांच्या बळावर राजकारणात आले नाही. लोकांनी जि.प. सदस्य म्हणून निवडून दिले. नंतर सदस्यांनी जि.प. अध्यक्षासाठी निवड केली. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षाची धुरा सांभळलेली आहे. इतकेच नव्हे, तर प्रदेश प्रतिनिधी म्हणून पीसीसीवर निवडून दिले होते. प्रभाताई राव प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी सात जणांना विधान परिषदेवर पाठविले होते. मुलगी म्हणून त्यांनी तेव्हाच ही संधी दिली असती. २००९ मध्ये प्रभातार्इंना खासदारकीची तिकीट मागविली होती. तेव्हा त्यांनी मला तिकीट नाकारली. त्यांचे निधन होऊन साडेपाच वर्षे झाली असताना वारसाहक्क म्हणून हे पद मिळाल्याचा आरोप साफ चुकीचा आहे. पक्षात आतापर्यंत जी भूमिका बजाविली, काँग्रेस अडचणीत असताना राहुल, सोनिया गांधी, प्रभा ओझा व अशोक चव्हाण यांना मी सक्षम वाटले असेल म्हणूनच त्यांनी ही जबाबदारी दिली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.